सोलापूर : शहर आणि जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी पाहता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काही निर्बंध कडक केले आहेत. शहर आणि जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर दोन लस घेतलेल्यानाच पेट्रोल देण्याची सक्ती प्रशासनाने केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला मात्र अनेक पंपांवर ग्राहक पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून अंगावर जात असल्याचे प्रकार घडत आहेत.
याअनुषंगाने सोमवारी (ता. २०) शहरातील पेट्रोल पंप चालकांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची कार्यालयात भेट घेतली. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, सोलापूर शहर पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धेश्वर वाले, उपाध्यक्ष प्रकाश हत्ती, योगेश चडचणकर, नंदूशेठ बलदवा, जगदीश पाटील, मल्लिनाथ पाटील यांच्यासह शहरातील पेट्रोल पंप धारक उपस्थित होते.
जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे याबाबत माहिती सांगताना म्हणाल्या, सोलापूर शहर व जिल्ह्यात 18 ते 45 या वयोगटातील लसीकरण न झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्या वयोगटातील लसीकरण अत्यंत गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे दोन कोरोना लस घेतलेल्यानाच पेट्रोल देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. पेट्रोल पंप धारकांनी याप्रकरणी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्याशी चर्चा करून पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे. प्रत्येक पेट्रोल पंपावर दोन पोलिस बंदोबस्त राहणार आहे तसेच शहरातील नवल, सुपर, कारीगर अशा प्रमुख पेट्रोल पंपांवर लसीकरणाची सोय करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* पहिल्यांदाच मशिदीत लसीकरण
सोलापूर महापालिकेच्या वतीने पहिल्यांदाच मशिदीत लसीकरण शिबीर घेण्यात आले. तेलंगी पाच्छा पेठेतील नुरे इस्लामी मस्जिद ट्रस्टमध्ये आयोजित शिबिरात ४०० जणांना लस देण्यात आली.
शहरातील धर्मगुरू अबुल कलाम यांनी लसीकरणासाठी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आगामी दिवसात शहरातील विविध प्रार्थना स्थळांमध्ये लसीकरण सत्र आयोजित करण्याचा मानस महापालिकेचा आहे. बोगस लसीकरणाविषयी तक्रारी येत आहेत , त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त धनराज पांडेंनी दिला आहे. आजपर्यंत शहरातील ५ लाख ९० हजार लोकांनी पहिला डोस तर साडेतीन लाख लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.
लसीकरणासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
शहरातील धर्मगुरू अबुल कलाम यांनी लसीकरणासाठी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आगामी दिवसात शहरातील विविध प्रार्थना स्थळांमध्ये लसीकरण सत्र आयोजित करण्याचा मानस महापालिकेचा आहे. तर बोगस लसीकरण झाल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त धनराज पांडेंनी दिला आहे.