Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पोलिओ लस म्हणून दिली बाळांना कावीळची लस; कर्मचारी – पोलीसाला धक्काबुक्कीत दोघांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पोलिओ लस म्हणून दिली बाळांना कावीळची लस; कर्मचारी – पोलीसाला धक्काबुक्कीत दोघांना अटक

Surajya Digital
Last updated: 2021/12/22 at 6:30 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर : बेलाटी ( ता. उत्तर सोलापूर ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ बालकांना पोलिओ लस ऐवजी कावीळ लस दिल्याने खळबळ उडाली. याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे या सर्व प्रकरणाची सीईओ दिलीप स्वामी यांनी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने बालकांना पोलिओ डोस देण्याची मोहीम सुरू आहे. काल मंगळवारी (ता. २१) उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी गावातील आरोग्य उपकेंद्रवरील आरोग्यसेविका शिंदे यांनी पोलिओ ऐवजी बालकांना काविळीची लस दिली.

यापूर्वी काविळीची लस देण्यात आली होती. डबल वेळा लस दिली गेल्याने बालकांना त्रास होऊ लागला. लसीची रिएक्शन झाल्याने, एक बाळ बेशुद्ध पडलं, तीन बाळांना ताप आला, एकूण सात बालकांना या ठिकाणी लसीकरण झाले होते.

नागरिकांनी जेव्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा सातही बालकांना ताबडतोब जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, अशी माहिती उत्तर सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शेगार यांनी दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना रात्री माहिती मिळाली असता त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्वरित त्यांनी सर्व प्रकरणाची चौकशी केली, डॉक्टरांशी चर्चा केली, सर्व बालके सुखरूप असल्याचं त्यांनी सांगत या प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

दरम्यान, सीईओ स्वामी यांनी या प्रकरणाची चौकशी मेडिकल कॉलेजच्या समितीकडून करणार असल्याचे सांगितले.

* मागे झाला होता बाळाचा मृत्यू

दोन वर्षांपूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगावमध्ये लसीकरणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात संबंधित आरोग्य सेविकेवर कारवाई झाली पुन्हा तिला कामावर घेण्यात आले. मात्र, मयत झालेल्या बालकाच्या आई-वडिलांना कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. या शासकीय मदतीसाठी ते कायम जिल्हा परिषदेला चक्कर मारतात मात्र कुणीही दखल घेत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

* होटगी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी आणि पोलीसाला धक्काबुक्की दोघांना अटक

सोलापूर – रांगेत न थांबता कोव्हीडची लस द्या, अशी धमकी देत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि पोलिस शिपायाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी (ता. २०) दुपारच्या सुमारास घडली.

या प्रकरणात वळसंगच्या पोलिसांनी सुशिल रेवणसिद्ध घोडके (वय ३०) आणि सिद्धाराम अमोगसिद्ध सोनकवडे (वय २४ दोघे रा. होटगी टगीगाव) या दोघांना अटक करून मारहाण आणि शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल केला.

होटगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हीड आजाराची लस देण्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणी नागरिक रांगेत  थांबून कर्मचाऱ्यांना सहकार्य करीत होते. त्यावेळी दुपारच्या सुमारास सुशील घोडके आणि सिद्धाराम सोनकवडे या दोघांनी रांगेत न थांबता आत जाऊन पहिल्यांदा आम्हाला लस द्या नंतर लोकांना द्या, अशी  कर्मचाऱ्यांना धमकी दिली. कर्मचाऱ्यांनी त्यांना रांगेत या असे सांगितल्यानंतर त्या दोघांनी सुभाष सतारवाले या कर्मचाऱ्यास शिवीगाळी केली. तेव्हा त्यांनी पोलिसांना बोलावले असता पोलीस शिपाई बिराजदार हे त्याठिकाणी येऊन दोघांना समजावून सांगत होते.

तेंव्हा तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका तुमचे दवाखान्यात काय काम आहे? असे म्हणत त्यांनी दोघांनाही शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. अशा आशयाची फिर्याद सुभाष मानसिंग सतारवाले या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्याने वळसंग पोलीसात दाखल केली. सहाय्यक निरीक्षक भोसले पुढील तपास करीत आहेत .

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Jaundice #vaccine #babies #polio #Employees #arrested #pushing #police, #पोलिओ #लस #बाळांना #कावीळ #कर्मचारी #पोलीस #धक्काबुक्की #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद मुलगा आदित्यकडे सोपवू शकतात’
Next Article विधानसभेत 8 पोलिसांसह 10 जणांना कोरोना

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?