सोलापूर : अक्कलकोट रोड वरील सादूल पेट्रोल पंपासमोर असलेल्या रस्ते कामामधील ड्रेनेजमध्ये पडून चौघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त पी शिवशंकर व अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे या दोन्ही अधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची पाहणी केली.
यानंतर माहिती देताना आयुक्त शिवशंकर यांनी, अमृत योजनेतून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम चालू आहे, तिथे ही घटना घडली आहे. याची संपूर्ण चौकशी करणार असल्याचे सांगताना निश्चित दोषी मक्तेदारावर कारवाई करणार, अशी माहिती शिवशंकर यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर-अक्कलकोट रोडवरील सादुल पेट्रोल पंपा समोर सुरू असलेल्या रस्ते कामामधील ड्रेनेजमध्ये पडून चौघा कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. मृत कामगार हे राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश आणि सांगलीमधील होते.
अक्कलकोट रोड परिसरातील मुख्य ड्रेनेज लाईनचे काम सुरू होते. त्याठिकाणचे काम पूर्ण झाले होते. परंतु, त्याची अंतिम स्वच्छता करून ड्रेनेज ब्लॉक होतो का, याची पडताळणी कामगार करीत होते. त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली.
सोलापूर – अक्कलकोट या चार पदरी रस्त्याचे काम सुरू आहे. चार पदरी रस्त्यांमुळे अगोदरच ड्रेनेजची कामे केली जात आहेत, मात्र हे काम करताना कोणतीही खबरदारी संबंधित मक्तेदार अथवा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली नसल्याचे पाहायला मिळतं. या ठिकाणी ड्रेनेज चेंबरला कोणतेही झाकणं लावली गेली नाहीत. रस्त्याला लागून असल्याने ती धोकादायक अवस्थेत आहेत.
बैचन परभू ऋषीदेव (वय, 36. रेवाडी, गुहाटी जि. अटरिया, बिहार), आशिषकुमार भारतसिंग राजपूत (वय 17, मगलाबहु मैनपुरी, उत्तरप्रदेश), विशाल हिप्परकर (वय 25, रा. जत, जि. सांगली) आणि सुनील ढाका (वय 25 रा. राजस्थान) अशी मृत कामगारांची नावे आहेत. हरिषशंकर बुरीर (वय 35, रा. उत्तरप्रदेश) आणि सैफन शेख ( वय -39, रा. नवीन विडी घरकुल, सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत.
आज गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या ड्रेनेजमध्ये चार जण पडले हे पाहता आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला बराच शर्थीचे प्रयत्न करून दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले मात्र त्यांची परिस्थिती गंभीर होती. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मात्र दुर्दैवाने या दुर्घटनेत दोघांचा ड्रेनेजमध्ये जागीच मृत्यू झाला. या मृतदेहांना रुग्णवाहिकेत घालून सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. दरम्यान नागरिकांनी महापालिका आणि संबंधित मक्तेदाराच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
● ति-र्हेजवळ अपघात दुचाकी चालक ठार
ति-र्हे ते सोलापूर रोड वरील सिद्धनाथ कारखान्याजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेने प्रकाश साधू कोरे (वय 56 रा. कोरवली ता.मोहोळ) हे दुचाकी चालक गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा अपघात काल बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडला.
प्रकाश कोरे हे कोयनानगर विद्युत कार्यालय येथे सिक्युरीटी म्हणून कामाला होते. काल रात्री ते कामावर जात असताना हा अपघात घडला. तालुका पोलिसात याची नोंद झाली असून अनोळखी वाहन चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फौजदार जाधव पुढील तपास करीत आहे.