Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: व्यापाऱ्याच्या कपाटांमध्ये सापडल्या कचऱ्यासारख्या नोटा, रोकड नेण्यासाठी मोठ्या कंटेनरची सोय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

व्यापाऱ्याच्या कपाटांमध्ये सापडल्या कचऱ्यासारख्या नोटा, रोकड नेण्यासाठी मोठ्या कंटेनरची सोय

Surajya Digital
Last updated: 2021/12/25 at 1:19 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

लखनौ : उत्तर प्रदेशातील कानपूरमधील व्यापारी पीयूष जैन यांच्या घरी आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. या छापेमारीवेळी आयकर विभागाला कपाटं भरून नोटा खच्चून भरलेले असंख्य बॉक्स सापडले आहेत. या छापेमारीत 150 कोटी रुपयांची अघोषित संपत्तीचा खुलासा झाला आहे. तसेच आयकर विभागाने 90 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. जैन हे पान मसाला समूहाचे संस्थापक आहेत.

कानपूरमध्ये अत्तर व्यावसायिक आणि सपा नेता पीयूष जैनच्या घरात इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकल्यानंतर मोठे घबाड आढळून आले आहे. जैन यांच्या घरातून तब्बल 177.45 कोटी जप्त केले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, जैन यांच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे सापडली आहेत.

त्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. घरातून 177.45 कोटी रुपये जप्त केले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली आहे. याआधी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 163 कोटी रुपयांची वसुली झाली होती. जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या  (डीजीजीआय) अधिकाऱ्यांनी एवढी मोठी रक्कम सुरक्षितपणे नेण्यासाठी चलनी नोटा घेऊन जाणाऱ्या कंटेनरची व्यवस्था केली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* रोकड नेण्यासाठी मोठ्या कंटेनरची सोय

एकूण आठ मशीनद्वारे पैसे मोजण्यात आले. रोकड सुरक्षितपणे नेण्यासाठी एका मोठ्या कंटेनरची व्यवस्था करण्यात आली होती. या छाप्याची फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. प्रत्येक फोटोत फक्त रोख रक्कम दिसते. नोटांचे इतके बंडल सापडले आहेत की लोकांना बँकेकडे मदतीसाठी फोन करावा लागत आहे.

अत्तर व्यावसायिक पीयूष जैन सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जवळचे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजवादी पार्टीच्या नावावरुन अत्तर लॉन्च केले होते. यामुळे ते चर्चेत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूष जैन यांच्या नावावर 40 कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून टॅक्स चोरी केली गेली आहे.

सीबीआय (CBIC) चे अध्यक्ष विवेक जौहरी यांनी कानपूर येथे केलेल्या छापेमारीनंतर म्हणाले, त्रिमूर्ती फ्रेगन्सेसच्या तीन संस्थांची केलेल्या छाप्यात जवळपास 150 कोटींची रोख मिळाली आहे. CBIC च्या इतिहासातील ही सर्वात मोठी वसूली आहे.

गुरूवारी सकाळी पीयूष जैन यांच्या घरी, कारखाना, ऑफिस, कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंपावर एकाच वेळी छापा टाकला. ही कारवाई कानपूर, कन्नौज, गुजरात, मुंबई येथे एकाचवेळी छापे टाकले. दरम्यान पीयूष जैन हे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जवळील आहे, अखिलेश यादव यांच्या उपस्थित त्यांनी एक महिन्यापूर्वी लखनौ येथे समाजवादी नावाचे अत्तर लॉन्च केले होते.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Garbage #notes #found #merchant's #cupboards #containers #carrying #cash, #व्यापारी #कपाट #सापडल्या #कचऱ्यासारख्या #नोटा #रोकड #मोठ्या #कंटेनर #सोय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एसटीचं विलीनीकरण डोक्यातून काढून टाका – अजित पवार
Next Article सोलापुरात विषबाधा, दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; आई – वडिलांवर उपचार सुरू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?