Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी नामांकन अर्ज सादर करण्याचे आवाहन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी नामांकन अर्ज सादर करण्याचे आवाहन

Surajya Digital
Last updated: 2021/12/25 at 3:54 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर मार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे आणि योगदानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे तसेच क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने देण्यात येणारा जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2021-22 या वर्षाकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.

सन 2021-22 वर्षाकरीता जिल्हा क्रीडा पुरस्कार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार नियमावली शासन निर्णय क्र. शिछपु 2018/ प्र.क्र.127/ क्रीयुसे-2 दि. 24 जानेवारी 2020 www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असुन त्याचा संकेतांक 202001242003053921 असा आहे. सदरच्या शासन निर्णयानुसार जिल्हा क्रीडा पुरस्कार गुणवंत खेळाडू पुरुष व महिला, दिव्यांग खेळाडू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक या प्रकारामध्ये पुरस्काराकरीता अटींची पुर्तता करुन विहित नमुन्यात अर्ज आवश्यक त्या छायांकित कागदपत्रासह सादर करणे आवश्यक आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या पुरस्काराकरीता दि.1 जुलै ते 30 जुन या कालावधीतील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगिरी केलेल्या खेळाडूंना शासन निर्णयानुसार थेटचे पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारार्थी यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रुपये 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

सन 2021-22 या वर्षाकरीता जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरण करण्याकरीता विहित नमुन्यातील अर्ज दि. 29  डिसेंबर 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील. तसेच विहित नमुन्यात भरलेला अर्ज, आवश्यक त्या छायांकित कागदपत्रे साक्षांकित करुन, 03 पासपोर्ट फोटो, पुस्तिकेच्या स्वरुपात एकत्रित बंद लिफाप्यात या कार्यालयात दि. 31 डिसेंबर 2021 रोजी कार्यालयीन वेळेत सादर करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, सोलापूर  नितीन तारळकर यांनी केले आहे.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Appeal #submit #nomination #District #Sports #Award, #जिल्हा #क्रीडा #पुरस्कार #नामांकन #अर्ज #सादर #आवाहन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात पहाटे अपघात, दोन ठार तर चौघे जखमी, ओझेवाडीत तलवारीने मारहाण
Next Article नीरव मोदीच्या पेंटिंगचा लिलाव, ईडीने हजार कोटी रुपये जमवले

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?