नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग याने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आता हरभजन राजकारणात उतरणार अशा चर्चांना उधाण आले आहे. यावर हरभजन सिंगने उत्तर दिले. ‘राजकारणात जायचं की नाही याबद्दल मी अजून विचार केलेला नाही. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून मला राजकारणाच्या ऑफर्स आल्या आहेत. त्याबद्दल शांतपणे आणि हुशारीने विचार करेन’, असं त्याने म्हटलं.
भारताच्या सर्वांत यशस्वी फिरकी गोलंदाजांपैकी एक ऑफस्पिनर हरभजनसिंग याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच, या दिग्गज खेळाडूची २३ वर्षांची कारकीर्द संपली.
हरभजनने १९९८ ला शारजा येथे न्यूझीलंडविरुद्ध वन डेत पदार्पण केले होते. भारतासाठी त्याने ढाका येथे २०१६ ला यूएईविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळला. मार्च २००१ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भज्जीने तीन सामन्यात तब्बल ३२ गडी बाद केले होते. त्यात भारतीय गोलंदाजाने घेतलेल्या पहिल्या कसोटी हॅट्ट्रिकचा देखील समावेश होता.
भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वीपासून तो राजकारणात येणार असल्याच्या चर्चा आहेत. परंतु अद्याप हरभजनने कोणत्या राजकीय पक्षात जाणार, याबद्दल काहीही वक्तव्य केलेले नाही. तसेच आपल्याला पक्षप्रवेशासाठी अनेकांकडून ऑफर येत असल्याचे म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हरभजनने सांगितले की, मी भविष्यातील योजनांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मी क्रिकेटशी जोडलेला राहीन. फक्त क्रिकेटमुळे लोक मला ओळखतात. जोपर्यंत माझ्या राजकीय कारकिर्दीचा प्रश्न आहे. तर मी स्वत: येत्या काळात याबाबत खुलासा करेन. जेव्हा असे काही घडेल तेव्हा मी स्वतः सर्वांना याची माहिती देईन. खरे सांगायचे झाले तर मी अद्याप याबाबत विचार केलेला नाही.
मला वेगवेगळ्या पक्षांकडून ऑफर आल्या आहेत, पण मी त्यावर बसून विचार करेन. हा छोटा निर्णय असणार नाही कारण या भूमिकेसाठीही खूप मेहनत घ्यावी लागते. मी कोणतेही काम अर्धवट मनाने करत नाही. ज्या दिवशी माझी मानसिक तयारी होईल, त्या दिवशी मी राजकारणात जाई, असे तो म्हणाला.
अभिनेत्री तथा हरभजनची पत्नी गीता बसरानं सोशल मीडियावर दोन निराळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. एका फोटोमध्ये गीता आणि हरभजन हे ड्रिंक्स पिताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये तिनं केवळ सेलिब्रेटिंग यू असं लिहिलं आहे. यासोबतच तिनं एक हार्ट इमोजीदेखील शेअर बनवला आहे.
“पुढे जाण्याचा हा प्रवास याप्रकारेच सुरू राहणार आहे. अजून अनेक गोष्टी आहे, ज्या तुमची वाट पाहत आहेत. खेळादरम्यान मी तुला तणाव आणि मस्ती या दोन्ही मूडमध्ये पाहिलं आहे. २३ वर्षे क्रिकेट खेळणं सोप नाही. मुलगी हिनाया हीनंही वडलांना स्टेडियममध्ये खेळताना पाहिलंय. मी भाग्यवान आहे की मी या क्षणांचा अनुभव घेऊ शकले,” असं तिनं लिहिलं आहे.