मुंबई : नव वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले करू शकतात, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांच्या उद्याच्या (31 डिसेंबर) साप्ताहिक आणि इतर सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांच्या उद्या (31 डिसेंबर ) साप्ताहिक आणि सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता आहे. मुंबईवर हल्ला करण्याचा कट खलिस्तानी आतंकवादी रचत असल्यामुळे मुंबई पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मुंबई पोलिसांना हल्ला होणार असल्याची माहिती दिलीय. त्यामुळे सर्वत्र बंदोबस्त वाढवला आहे.
रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत 7 जानेवारीपर्यंत कलम 144 जमावबंदी लागू केलीय. तसेच मोठ्या पार्ट्यांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली असून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यात गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीमुळे शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
All police holidays & weekly holidays have been cancelled tomorrow and every policeman posted in Mumbai will be on duty. Information was received that Khalistani elements could carry out terrorist attacks in the city, after which the Mumbai Police has been on alert: Mumbai Police
— ANI (@ANI) December 30, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मुंबईवर उद्या हल्ला होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांच्या उद्या सर्व सुट्या रद्द केल्या आहेत. दरम्यान, सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रमुख स्थानकं जसे दादर, वांद्रे, चर्चगेट, सीएसएमटी, कुर्ला आणि इतर स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उद्या 3000 हून अधिक रेल्वे अधिकारी तैनात केले जातील, अशी माहिती मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त क्वेसर खालिद यांनी दिली आहे.
कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि पाकिस्तानसह परदेशात बसलेले खलिस्तानी दहशतवादी भारतविरोधात अनेक दिवसांपासून कारवाया करत आहेत. अलीकडच्या काळात भारत सरकारने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात उचललेल्या कठोर पावलांमुळे खलिस्तानी खवळले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय खलिस्तानी दहशतवाद्यांवर भारताविरोधात कट रचण्यासाठी दबाव आणत आहे. यामुळे खलिस्तानी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाली आहे.