सोलापूर – ओळखीचा दुरुपयोग करीत दोघां अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन त्यांना गर्भवती केल्याची निंदनीय घटना शहरात उघडकीस आली. या प्रकरणात सदर बजारच्या पोलिसांनी कुणाल श्रीकांत साय बोळू (वय २३ रा. प्रकाश बापूजी हाउसिंग सोसायटी, लष्कर) या नराधमाला अटक केली. त्याला ४ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालयाने आज गुरुवारी दिला.
कुणाल सायबोळू बाळू वीटभट्टी कामगार असून त्या ने आपल्या ओळखीतील एका अल्पवयीन मुलीला माझ्या बहिणीने तुला बोलावले आहे. असे म्हणून जुलै महिन्यात तिला घरी आणले होते. आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला होता. त्यानंतर पुन्हा धमकी देऊन त्याने अत्याचार केला होता.
दरम्यान ती मुलगी गर्भवती झाल्याने हा प्रकार नुकताच उघडकीस आला. या पूर्वीदेखील आरोपी कुणाल याने असाच प्रकार करून दुसर्या एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करून तिचा गर्भपात केला होता. हे दोन्ही प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या आईने सदर बझार पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी त्याच्यावर दुहेरी बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पुढील तपास पोलिस निरीक्षक भोसले या करीत आहेत.
* टेम्पोच्या धडकेने मोटारसायकलस्वार ठार
सोलापूर : कुंभारी ते सिध्देश्वर साखर कारखाना या रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोची धडक लागून मोटारसायकलस्वार गंभीर जखमी होवून जागीच ठार झाला. हा अपघात मंगळवारी ( ता.२८ ) झाला. सिध्दाराम चंद्रकांत सारवाड (वय ३२, रा. बॉम्बे पार्क , ज्योती गृहनिर्माण सोसायटी जवळ सोलापूर) असे मृताचे नाव आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा त्याच्या जवळील एम एच १३ डी के ६६२४ या मोटारसायकलवरून कुंभारी ते सिध्देश्वर साखर कारखाना या रस्त्यावरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एम एच १२ जी टी ०५९८ या टेम्पोने धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या अपघाताला टेम्पोचालक जबाबदार असल्याची फिर्याद मृताचा भाऊ बसवराज चंद्रकांत सारवाड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. पुढील तपास पोलीस नाईक मुजावर करीत आहेत.
* बंद कारखान्यात चोरी करताना तिघा वॉचमनसह चौघांना रंगेहात पकडले
सोलापूर – कोंडी एमआयडीसी परिसरातील बंद असलेल्या सिमको मिलमधील स्पेअर पार्ट चोरून दुचाकीवरुन जात असताना रात्रीची गस्त टाकणाऱ्या तालुका पोलिसांनी चौघांना अटक करून ४५ हजाराचे लोखंडी साहित्य जप्त केले. ही घटना बुधवारी (ता. २९) पहाटेच्या सुमारास पुणे महामार्गावरील सिमको ब्रिज जवळ उघडकीस आली.
शिवम सियाराम दुबे (वय ३०) अशोक लाल मनोज तिवारी (वय ४५) अंकित अशोक तिवारी (वय २१ सर्व रा.चिंचोळी एमआयडीसी) आणि अक्षय हरिदास बोबडे (वय ३९ रा. राहुरी,कोंडी ता.उत्तर सोलापूर) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना २ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास तालुक्याचे पोलीस गस्त टाकत असताना पुणे महामार्गावरील सिमको व्रिजजवळ जवळ दोघेजण दुचाकीवर लोखंडी साहित्य नेत असताना आढळले.
पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता आणखी दोघे सिमको कंपनीत असल्याचे सांगितले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी स्पेअरपार्ट चोरून त्याची विक्री करणार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दुचाकी आणि लोखंडी साहित जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यापेकी तिघे त्याच कंपनीत वॉचमन असल्याचे समजले. पुढील तपास हवालदार देवकर हे करीत आहेत.