Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उद्धव ठाकरेंना मोठा झटका; राज्यपालांनी दिला आदेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

उद्धव ठाकरेंना मोठा झटका; राज्यपालांनी दिला आदेश

Surajya Digital
Last updated: 2022/01/02 at 9:33 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई पालिकेच्या खांद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नवा झटका दिला आहे. आश्रय योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले आहेत.

महापालिकेच्या आश्रय योजनेत १८४४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी केला. भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

मुंबई महानगरपालिकेची सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्विकासासाठीची आश्रय योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या योजनेत शिवसेनेने घोटाळा केल्याचे आरोप भाजपाने केले आहेत. यानंतर भाजपाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल केली आहे.

या तक्रारीनंतर आता राज्यपालांनी या योजनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यपाल कोश्यारींनी लोकायुक्तांना या प्रकरणाच्या चौकशीच्या सूचना केल्या आहेत. ही योजना आता चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने शिवसेनेला चांगलाच झटका बसला आहे.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी यासंदर्भातील पत्र पाठवलं आहे. या पत्रासंदर्भात भाजपचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी माहिती दिली आहे. हा प्रस्ताव मंजूर होत असतानाच भाजपाने त्यावरती आक्षेप नोंदवला होता. मात्र भाजपच्या आक्षेपानंतरही हा प्रस्ताव मंजूर झाला.

दरम्यान विनोद मिश्रा आणि भाजपाच्या शिष्टमंडळाने १७ डिसेंबरला राज्यपालांची भेट घेत याबाबतची तक्रार दिली आहे. मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ हजार ८४४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी केला आहे.

* आश्रय योजनेविषयी माहिती

आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांच्या ३९ वसाहतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. यासाठी १ हजार ८४४ कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेत मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाच्या मंजूरीस भाजपाने विरोध केला होता. मात्र विरोधानंतरही हा प्रस्ताव मंजूर झाल्याने विनोद मिश्रा यांनी योजनेत घोटाळा झाल्याचा दावा करत राज्यपालांना लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकायुक्तांना योजनेची चौकशी करण्याची सूचना केली आहे.

विनोद मिश्रा यांनी योजनेत घोटाळा झाल्याचे आरोप करत राज्यापालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांसाठी ३९ वसाहतींचा पुनर्विकासाठी ३३ लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्याचा आराखडा होता.

पण कंत्राटदारांच्या इच्छेनुसार पालिकेने ७९ लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खर्चात अनेक पटीने वाढ झाली. त्यामुळे बांधकामाच्या निविदा या ठराविक कंत्राटदारांना काम मिळाव्या अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या होत्या. मात्र सफाई कामगारांना चांगली घरे मिळायला हवीत. पण सफाई कर्मचाऱ्यांच्या नावे जो भ्रष्टाचार सुरु आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Bigblow #UddhavThackeray #Order #issued #Governor, #उद्धवठाकरे #मोठाझटका #राज्यपाल #आदेश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पोलिसांनी एसटी आंदोलकांना आझाद मैदानातून हटवले
Next Article शिवसेना नेते, आमदार तानाजी सावंत मोठा झटका देणार?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?