पुणे / सोलापूर : शिवसेना नेते व आमदार तानाजी सावंत हे शिवसेनेला मोठा झटका देण्याच्या तयारीत दिसत आहे. ते पक्ष बदलणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. आज त्यांच्या पुण्यातील कात्रज येथील घरी भाजप नेते छत्रपती संभाजीराजे भोसले पोहोचले आहेत. त्या दोघांमध्ये मागील काही वेळापासून चर्चा झाली. त्यामुळे तानाजी सावंत हे आज नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या आमदार तानाजी सावंत मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. त्यामुळे ते पक्ष बदलणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. आज त्यांच्या पुण्यातील कात्रज येथील घरी भाजपचे नेते छत्रपती संभाजीराजे भोसले आले आहेत. त्या दोघांमध्ये मागील काही वेळापासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे तानाजी सावंत हे आज नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तानाजी सावंत यांनी काल आपली पुढची राजकीय भूमिका घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू आहे. त्यानंतर अवघ्या काही वेळात ते आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कात्रज येथील घरी भाजपचे नेते छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भेट दिली. तसेच बराच वेळापासून दोघांमध्ये चर्चा सुरु असल्याने अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना सावंत यांनी मी सध्या शिवसेना पक्षात असून शिवसेनेतच राहील असे, सांगितले होते. तसेच शिवसेना पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी मी सजग होऊन पार पाडत आहे. कोण काय म्हणतंय तसेच काय चर्चा करतोय याकडे मी लक्ष देत नाही, असे देखील सावंत म्हणाले होते. परंतु संभाजीराजे सोबतच्या आजच्या भेटीनंतर तानाजी सावंत नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
□ तानाजी सावंतांविषयी थोडक्यात
तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सावंत यांनी शिक्षण क्षेत्रासह, राजकारण आणि कारखानदारीत आपली कारकीर्द सिद्ध केली आहे. कार्यक्षेत्र म्हणून पुण्याची निवड करत जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात सोनारी येथे भैरवनाथ शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी करीत त्यांनी साखर उद्योगात पाऊल ठेवले.
सध्या भैरवनाथ शुगर कारखान्याचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पाच युनिट कार्यान्वित आहेत. सध्या ते उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटेंचा पराभवाचा केला.
परंतु, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळेच ते शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. परंतु, ते नेमके कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.