अक्कलकोट : धोत्री (ता.द.सोलापूर ) येथून पाच लाख रुपयाच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या आठ वर्षाच्या मुलाला वळसंग पोलिसांनी आज सुखरूपपणे नातेवाईकांच्या ताब्यात दिले. अपहरण करणाऱ्या पाच आरोपींना सांगली व बेळगावमधून पोलिसांनी अटक केली.
धोत्री येथील बसस्थानकावरून इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या पृथ्वीराज सुरेश बिरादार या मुलाचे गुरुवारी ( ३० डिसेंबर ) सकाळी साडेसहाच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. त्याच दिवशी वळसंग पोलिस ठाण्यात कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून मुलाचे अपहरण केल्याची फिर्याद देण्यात आली होती.
त्यांच्या मुलाच्या शोधासाठी वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी पाच टीम तयार करून विविध ठिकाणी तपासासाठी पाठविले.
मुख्य आरोपी संतोष धोंडप्पा शेडशाळ ( वय २७ रा. किर्लोस्करवाडी, पलूस जिल्हा सांगली), सराफ व्यवसायिक रमेश भीमगोंडा बिरादार (वय ३८ , रा. हल्लुर तालुका मडोलगी जिल्हा बेळगाव), नितीन उर्फ चार्ली धोंडप्पा शेडशाळ (रा. बाबानगर ता. तिकोटा जि. विजापूर सध्या राहणार रामानंद नगर नलावडे मळा पलूस जिल्हा सांगली), लक्ष्मण किसन चव्हाण (वय २७ , रा. लऊळ, ता. माढा, जिल्हा सोलापूर) व केदार बाळासाहेब शिवपुजे (वय २०, राहणार कुंडल हायस्कूल रोड ता. पलूस जि. सांगली) यातील अपहरण झालेला मुलगा कुंडल सांगली येथे आरोपी केदार बाळासाहेब शिवपुजे याच्याकडे मिळाला. या अपहरणातील पाचही आरोपींना कुंडल ( सांगली), पलूस (सांगली) व हल्लूर बेळगाव येथून ताब्यात घेण्यात आले.
सदर आरोपींनी पाच लाख रूपयांची खंडणी उकळण्याचे उद्देशाने सदर मुलाचे अपहरण केले असल्याची कबुली दिलेली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी प्रभारी अधिकारी अतुल भोसले व तपास पथकांनी केलेल्या तपासचे कौतुक केले. तसेच धोत्री ग्रामस्थांनी पोलीसांचा सत्कार करून कौतुक केले. अटक केलेल्या आरोपींना उद्या अक्कलकोटच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…