भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मोहाडी ठाण्यात गोंधळ घालून अश्लील शिविगाळ केल्या प्रकरणी पोलिसांनी कारेमोरे यांना अटक केली. कारेमोरे यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने न्यायालय परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
काल रविवारी पत्रकार परिषद घेवून या प्रकाराबद्दल माता-भगिनींची माफीही मागितली हाेती. आज साेमवारी त्यांना भंडारा येथे चाैकशी साठी बाेलाविण्यात आले हाेते.
पोलिसांना अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करीत कामात बाधा निर्माण केली होती. दरम्यान पोलिसांनी त्याच्यासह काही लोकांच्या विरोध कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. रविवारी त्यांना अटक केली. वैद्यकीय चाचणी केल्यानंतर न्यायालयात केले हजार करण्यात आले आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
३१ डिसेंबरच्या रात्री दाेन व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी आमदार राजू कारेमाेरे माेहाडी ठाण्यात गेले हाेते. त्याठिकाणी त्यांनी प्रचंड गाेंधळ घालत पाेलिसाना अश्लील शिवीगाळ केली. या शिवीगाळीचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली हाेती.
* नेमके काय प्रकार, वाचा
कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे ३१ डिसेंबरच्या रात्री दहा वाजता तुमसरकडे जात होते. सोबत त्यांनी आमदारांच्या घरून ५० लाख रुपयांची रोकड घेतली होती. मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंळाच्या स्टँग रूमच्या बंदोबस्ताकरिता लावण्यात आलेल्या पोलिसांनी कार अडविली.
वळण असताना गाडी चालकांना इंडिकेटर का दिले नाही म्हणून पोलिसांनी कारचा पाठलाग केला. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला अडवून बेदम मारहाण केली. मला आणि अविनाश पटले दोघांनाही मारहाण करून आमच्याजवळील ५० लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पळविली, अशी तक्रार यासीम छवारे यांनी मोहाडी पोलिसात दिली होती.
तर बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक राणे यांनी देखील पटले आणि धवारे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करून घेत तपास सुरु केला होता.