सोलापूर : जुना देगाव नाका येथील थोबडे वस्तीतील रितेश बालक मंदिर शाळेला (school) आज संस्थाचालकांच्या सूचनेनुसार कुलूप (lock) घातले. त्यामुळे शिक्षक (teacher) विद्यार्थ्यांना (students) भर उन्हात बाहेर बसावे लागले.
विद्यार्थी बाहेर बसल्याने पालकांची गर्दी (crowd) झाली. पालकांकडून विचारणा केली असता मुख्याध्यापिका (principle) नीता कांबळे यांनी अचानक दाखला घेऊन जाण्याची भाषा केल्याचे पालकांनी सांगितले. अधिक माहिती (information) घेतली असता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना वा-यावर सोडले असून सातवी ते दहावीचे (10th) वर्ग चालू असल्याचे सांगितले.
संस्थाचालक विजया थोबडे यांनी शाळेकडून ठरावीक रक्कमेची (money) मागणी (demand) केली आहे. आता अचानक आणि कोरोनाकाळात (corona) आर्थिक परिस्थितीवर नसताना या विद्यार्थ्यांकडून रक्कम कशी मागायची असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. कित्येक दिवस शाळा बंद (school closed) होती, आता चालू झाली असताना पैशावरून विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती (fear) निर्माण झाल्याचे उपस्थित पालकांनी सांगितले.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी मुख्याध्यापिका कांबळे यांना फोन (phone) केला असता त्यांचा फोन बंद होता. मात्र या परिस्थितीत भर उन्हात पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना अडीच ते तीन तास बसावे लागले. तरीही कोणताही संस्थाचालक, सदस्य अथवा मुख्याध्यापक घटनास्थळी आले नाहीत. आपली शाळा बंद होणार का आणि आपल्या पाल्याचे काय होणार हीच चिंता विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या चेह-यावर प्रकर्षाने जाणवत होती.
शहरातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ वकिल मिलिंद थोबडे यांचा वकिल मुलगा रितेश थोबडे यांच्या नावाने ही शाळा सुरू आहे. थोबडे वस्तीतील प्रत्येक समाज कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. येथील लोक त्यांना थोबडेमालक नावाने ओळखतात. येथील अनेक मंदिरे आणि समाज मंदिरासाठी त्यांनी जागा देऊन आर्थिक मदत (help) केली आहे. अशा व्यक्तीच्या नावाने असलेल्या शाळेसमोर असा प्रकार घडावा, याबाबत तेथील रहिवासी आणि पालकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात होते.
शाळेला कुलूपसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी ॲड. मिलिंद थोबडे यांना फोन केला असता त्यांनी याबाबत आपणास माहिती नसून माहिती घेतो, अशी प्रतिक्रिया मिळाली. मात्र विद्यार्थ्यांना आजचा दिवस गेटच्या बाहेरच काढावा लागला. शाळा सुटण्याची वेळ होताच हाताश होऊन विद्यार्थी घरी परतले. मात्र पालक आणि विद्यार्थ्यांना उद्या तरी शाळा भरणार का, याबाबत संभ्रम आणि चिंता आहे.