कुर्डूवाडी : बापुसाहेब जगताप युवा मंच आयोजित राज्यस्तरीय टेनिस बॉल (state level tennis ball ) क्रिकेट स्पर्धेच्या ( cricket tournament) “बॉल चषकावर” कुस्तीसम्राट अस्लम काझी क्रिकेट संघाने कर्णधार नुर शेख च्या नेतृत्वाखाली संपूर्ण चषकात दर्जेदार खेळ सादर करीत एकहाती वर्चस्व राखले.
उपांत्य फेरीत बलाढ्य कर्नाटक संघाला (karnataka team) पराभूत करीत सोलापूर संघाला अंतिम सामन्यात कुस्तीसम्राट संघाने तब्बल 61 धावांनी पराभूत करीत बाँस चषकावर निर्विवाद वर्चस्व (Undisputed dominance) राखले. याबद्दल कुस्तीसम्राट संघाचे आरपीआय नेते बापुसाहेब जगताप , आमदार संजयमामा शिंदे , नगरसेवक सुरज जगताप , आकाश जगताप, कुस्तीसम्राट अस्लम काझी तसेच सर्व पक्षीय नेते (All party leaders) यांनी अभिनंदन केले.
कुर्डूवाडी येथील मध्य रेल्वेच्या मैदानावर पार पडलेल्या बाँस चषकात प्रत्येक सामन्यात कुस्तीसम्राट संघाने (Wrestling team) एकहाती सामने जिंकले. अंतिम सामन्यात सोलापूर संघाला (solapur team) कुस्तीसम्राट संघाने तीन बाद 120 धावांचे लक्ष दिले होते. परंतू सोलापूरच्या संघाला केवळ 3 बाद 59 धावाच जमवता आल्या. कुस्तीसम्राटच्या वतीने एजाज कुरेशी या फलंदाजाने 25 चेंडूत 75 धावा (runs) करुन नवीन रेकाँर्ड केला. तर कुर्डूवाडी भूमीपूत्र टेनिस बाँलचा बादशहा असलेल्या किसना सातपुतेला 10 चेंडूत 37 धावा करण्यात यश आले. कुस्तीसम्राटचा कर्णधार (captain) नुर शेख यांने संपूर्ण चषकात चांगली कामगिरी केली. तर संपूर्ण चषकात मँन आँफ दी सिरीज (man of the series) चा मानकरी किसना सातपुतेला मिळाला.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
प्रथम आलेल्या कुस्तीसम्राट संघाला सन्मान चिन्ह व रोख रक्कम एक लाख रुपऐ बक्षिस दिले. द्वितीय सोलापूर संघाला रोख 50 पन्नास हजार रुपऐ व सन्मान चिन्ह तसेच तृतीय बक्षिस (award) कर्नाटक संघाला रोख तीस हजार रुपए व सन्मान चिन्ह देण्यात आले.
संपूर्ण बाँस चषकच्या दरम्यान रेल्वे मैदानाला ऊत्कृष्ट सजावट व उत्तम दर्जेदार खेळपट्टी बनवण्याचे काम श्रीकांत अस्वरे, संजय जगताप यांनी केले. समोलचन विभाग मुन्ना स्वामी , निखिल कदम , बाळु झिंगळे यांनी पार पाडले. पंच म्हणून विल्सन काळे , सचिन लोंढे , विजय जानराव यांनी काम केले. सामना यशस्वी करण्यासाटी हज्जु शेख, बापुसाहेब जगताप युवा मंच यांनी परिश्रम (Diligence) घेतले.
□ कुस्तीसम्राटच्या या शिलेदारांचा झाला सन्मान
अंतिम सामना जिंकलेल्या कुस्तीसम्राट संघातील नुर शेख (कर्णधार) ,श्रीकांत खोत , किसना सातपुते , एजाज कुरेशी , बालाजी रुपनेर (यष्टीरक्षक ), सोहेल तांबोळी, निखील गायकवाड , दिंगबर माने , आझिम शेख , सोनु भालके , अजय माने , अजय गोरे , प्रविण देवकते , अभिजित दुधे या खेळांडुचा सन्मान बापुसाहेब जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
– उत्कृष्ट यष्टीरक्षक – बालाजी रुपनेर (कुस्तीसम्राट संघ)
– उत्कृष्ट फलंदाज – वकिल शेख (सोलापूर संघ)
– उत्कृष्ट गोलंदाज – फैजल पटेल (सोलापूर संघ)
– मँन आँफ दी मँच – एजाज कुरेशी -(कुस्तीसम्राट संघ)
□ यष्टीरक्षक बालाजी रुपनेरची चर्चा
यंदाच्या बाँस चषकाच्या कुस्तीसम्राट संघाच्या प्रत्येक सामन्यात यष्टीरक्षक (Wicketkeeper) बालाजी रुपनेर च्या चपळाई व त्याच तेज नजरेची चर्चा सर्वत्र राहिली. अतिशय वेगवान गोलंदाजांच्या गोलंदाजीला देखील क्लोज यष्टीरक्षण करीत अनेक फलंदाजाना तंबुत परतवण्याचे काम बालाजी रुपनेर यांनी केले. उत्कृष्ट यष्टीरक्षकाचा मान देखील चषकात देण्यात आला.