Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात पाच जणांवर मोक्का; सहा दिवसांची पोलीस कोठडी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरात पाच जणांवर मोक्का; सहा दिवसांची पोलीस कोठडी

Surajya Digital
Last updated: 2022/01/08 at 8:40 PM
Surajya Digital
Share
7 Min Read
SHARE

सोलापूर : संघटित गुन्हेगारी करून सोलापूर शहरात दहशत निर्माण करणाऱ्या पाच अट्टल आरोपींवर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या आदेशानुसार मोक्का लावण्यात आला आहे. या आरोपींना न्यायालयासमोर (court) हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी ( police custody) सुनावण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फौजदार चावडी पो.स्टे. गुन्हा रजि. नंबर ७९८/२०२१ भादवि ३९९, ४०२ सह आर्म ॲक्ट ४(२५) प्रमाणे हा दिनांक २४/११/२०२९ रोजी दाखल आहे. आरोपी नामे (१) संतोष संजय कांबळे, वय २९ वर्षे, रा. जय मल्हार चोक, भागवती मंदिराचे पाठीमागे आडवा नळ, सोलापूर (२) चंद्रकांत विठ्ठल दिक्षीत, वय-२५ वर्षे, रा. शिवगंगा नगर, भाग-५ कुमठा नाका, सोलापूर (३) सतिश अनिल गायकवाड वय २४ वर्षे, रा. शिवगंगा नगर, भाग-५ कुमठा नाका, सोलापूर (४) अकाश महादेव माडगे, वय-२२ वर्षे, प्लॉट नं. २६ कलप्पा म्हेत्रे वस्ती, कुमठा नाका, सोलापूर (५) अक्षय दिगंबर उर्फ आब्बाराव शिंदे, वय २६ रा. जय मल्हार चौक, भागवती मंदिराच्या पाठीमागे, सोलापूर (solapur) यांना दिनांक २४/१२/२०२१ रोजी पोसई देशमाने, फौजदार चावडी पोलीस ठाणे  सोलापूर शहर यांनी अटक (arrested) केली आहे.

दिनांक २४/११/२०२१ रोजीचे रात्रीचे वेळी सदर गुन्हयातील मुख्य आरोपी संतोष संजय कांबळे हा त्याचे साथीदारांसह जुना पुना नाका (old puna naka)  येथील युनियन बँकेचे ए.टी.एम. (union bank atm) फोडण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी (news) मिळालेने फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील रात्रगस्तीचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक बरडे, पोका १४५६ बहुरे, पोका/ ९६०४ व्हटकर, पोको/८८७ ओंचासे, पोकों/१९९ साठे, पोकों/९२६ कांबळे, पोकों/१५५२ माने यांनी जुना पुनानाका याठिकाणी नाकाबंदी लावून पहाटे ०४.१० वा.चे सुमारास मुख्य आरोपी संतोष कांबळे व त्याचे वरील चार साथीदारांना तवेरा गाडी (taver vehicles) क्रमांक एम.एच.२४.व्ही.०६४४ सह जुना पुना नाक्या पासून थोड्या अंतरावर लोकमंगल बँकेचे (lokmangal bank) समोर ताब्यात घेतले.

या आरोपींची तवेरा गाडीची तपासणी केली असता त्यांना गाडीमध्ये लोखंडी हातोडा, लोखंडी छन्नी, कोयता, चाकू, लोखंडी टॉमी, लाल मिरची पावडर, नकली बेनटेक्सचे दागिने व रोख रक्कम मिळून आली असून सदर आरोपींकडून एकूण ५,७८,२५९/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक १ (टोळी) संतोष संजय कांबळे, वय २९ (रा. जय मल्हार चौक भागवती १ मंदिराचे पाठीमागे आडवा नळ सोलापूर) हा त्याचे नेतृत्वाखाली संघटनेत सद्या सक्रिय असलेले सदस्यांचे व्यतिरिक्त वेळोवेळी इतर सदस्यांना बरोबर घेवून संघटीत गुन्हेगारी (Organized crime) संघटनेचे माध्यमातून स्वतःसह त्याचे नेतृत्वाखाली संघटीत गुन्हेगारी संघटनेतील प्रत्येक सदस्यांसाठी आर्थिक लाभ (Economic benefits) संपादित करण्यासाठी संघटीत गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख व इतर सदस्य संयुक्तपणे गंभीर हिंसाचार (Severe violence) केला. जुलूम जबरदस्ती करून दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी चोरी, सरकारी नौकरावर प्राणघातक हल्ला (Assault) करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, घातक शस्त्र जवळ बाळगून जबरीची चोरी करणे, सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, अशा प्रकारचे मालाविरुध्दचे व शरिराविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करत असलेने व मागिल दहा वर्षात त्यांनी अशा पध्दतीचे गुन्हे केले.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

यातील आरोपी क्रमांक १ व त्याचे गुन्ह्यातील इतर साथीदार यांचे विरुध्द वरील दाखल गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) प्रमाणे वाढीव कलम अंतभूत करण्याची परवानगी मिळणे करिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फोजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी जा.क्र. ८८२६/२०२१ दिनांक २७/१२/२०२१ प्रमाणे पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

त्यानुसार सोलापूर शहर यांनी दिनांक ३१/१२/२०२१ रोजी सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१)(ii), ३(२), ३(४) प्रमाणे कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे.

त्याप्रमाणे दिनांक ०१/०१/२०२२ रोजी वरिल नमूद गुन्हा रजि. नंबर ७९८/२०२१ भादवि ३९९,४०२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३(२). ३(४) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहे. सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने यातील आरोपींना दिनांक ०६/०१/२०२२ रोजी मा. विशेष न्यायाधिश, मोक्का न्यायालय सोलापूर यांचे न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक १३/०१/२०२२ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड (custody remind) मंजूर करण्यात आलेली आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी (टोळी प्रमुख) संतोष संजय कांबळे व त्याचे गुन्ह्यातील इतर साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्तालय सोलापूर अंतर्गत फौजदार चावडी, जेलरोड, जोडभावीपेठ, एमआयडीसी व सदर बझार पोलीस ठाणेस मालाविषयी व शरिराविषयी एकूण २७ गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपआयुक्त (परीमंडळ) डॉ.संतोष गायकवाड सहायक पोलीस आयुक्त, विभाग १ सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली, राजेंद्र बहिरट वरीष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक एस. बी. देशमाने, पोहेकॉ/ ५६९ उबाळे, पोहेकों/१२५ गायकवाड, पोना/ ६०० वाघमारे यांनी केली आहे.

● उपळाईचे सरपंच संदीप पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला

माढा : माढा तालुक्यातील उपळाई खुर्दचे विद्यमान सरपंच संदीप विष्णूपंत पाटील यांच्यावर दारफळ येथील आनंद बारबोले याने  पिस्तुल मधून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने माढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पिस्तुल लॉक झाल्याने पुढील अनर्थ टळल्याचे सांगितले.

सरपंच संदीप पाटील यांच्यावर गोळी झाडणारा आरोपी आनंद बारबोले हा प्रमोद जाधव यांचा मेव्हणा असून तो आर्मी मध्ये नोकरीला असल्याची माहिती आहे. दरम्यान प्रमोद हा पेट्रोल पंपावरून डिझेल पेट्रोल चोरी करत असल्याबाबत संदीप पाटील यांनी विचारपूस केली असता त्याचा राग मनात धरून ही घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त (first information) आहे.

याबाबत माढा पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेआठच्या सुमारास फिर्यादी संदीप पाटील हे त्यांच्या उपळाई खुर्द येथे घरासमोर उभे असताना प्रमोद लक्ष्मण जाधव, विनोद लक्ष्मण जाधव, सुवर्णा लक्ष्मण जाधव, कौशल्या अभिमन्यू जाधव, ( सर्व रा.शिंदेवाडी ता.माढा) व आनंद शिवाजी बारबोले, तनुला आनंद बारबोले (रा दारफळ सीना ता माढा) हे आले व त्यांनी फिर्यादीला तुम्ही प्रमोदवर डिझेल चोरीचा खोटा आरोप का केला, असे म्हणून शिवीगाळ केली.

त्यावेळी संदीप पाटील यांच्या भावकीतील किरण पाटील व समाधान पाटील यांनी आरोपींना उद्देशून तुम्ही संदीप पाटील यांना शिवीगाळ (Swearing) का करता, अशी विचारणा केली. महिलांनी हाताने व लाथा बुक्क्यांनी तर प्रमोद जाधव याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने संदीप पाटील यांच्या भावकीतील लोकांना मारहाण केली.

संदीप पाटील सोडविण्यासाठी मध्ये गेले असता विनोद जाधव हा संदीप पाटील याच्या अंगावर धावून गेला  व आनंद बारबोले याने त्याच्या जवळील पिस्तुल काढून संदीप पाटील यांच्यावरती रोखून जीवे मारण्याच्या उद्देशाने फायरिंग केली.

या प्रकरणी सर्व आरोपींना अटक (arrested)  केली आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक  हिम्मत जाधव व पोलीस उपविभागीय अधिकारी  विशाल हिरे यांनी घटनास्थळी (At the scene) भेट देऊन चौकशी केली. घटनेचा अधिक तपास सहायक  पोलिस निरीक्षक शाम बुआ करत आहेत.

You Might Also Like

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

उजनीतून ३७ लाख युनिट वीजनिर्मिती

TAGGED: #Mocca #five #Solapur #Sixdays #police #custody, #सोलापुरात #पाचजण #मोक्का #सहादिवस #पोलीसकोठडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उपळाईचे सरपंच संदीप पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला
Next Article महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू, वाचा नवीन नियमावली

Latest News

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू
Top News July 10, 2025
मुख्यमंत्री विदर्भाचा, पण काही कामाचा नाही – बच्चू कडू
Top News July 10, 2025
ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात, 2145 वैज्ञानिक ‘नासा’मधून पडले बाहेर
Top News July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?