चेन्नई : कोरोना (corona) आणि ओमिक्रॉनच्या (Omicron पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) आज (रविवार) संपूर्ण लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आला आहे. या काळात सर्व दुकाने (shop), आस्थापने बंद राहणार आहेत. फक्त अत्यावश्यक (essential) सेवाच सुरू राहणार आहेत. या वर्षातील हा पहिला लॉकडाऊन ठरला आहे. तसेच कर्नाटकमध्ये (karnataka) नाईट कर्फ्यूही घोषित (night curfew declared) करण्यात आला आहे. दरम्यान, येथील मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लावण्यात येत असून, तामिळानाडू सरकारने राज्यात गुरुवारपासून रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. तामिळानाडूमध्ये कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 27 लाख 55 हजार 587 झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 412 झाली आहे. राज्यात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 121 रुग्ण आढळले आहेत.
यानुसार रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. याशिवाय रविवारी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, सर्व सार्वजनिक आणि खाजगी पोंगल सांस्कृतिक उत्सव (Cultural festival) पुढे ढकलण्यात आले आहेत.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले की, 6 जानेवारीपासून रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याशिवाय रविवारी 9 जानेवारी रोजी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, रेस्टॉरंट्सना (Restaurant) सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत टेकवे चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. बस, ट्रेन आणि मेट्रोमध्ये फक्त 50 टक्के वहिवाटीला परवानगी (permission) असेल.
सर्व मनोरंजन आणि करमणूक उद्याने बंद राहतील. याशिवाय इयत्ता 1 ते 9 वीच्या वर्गांसाठी फक्त ऑनलाइन वर्गांना परवानगी देण्यात आली आहे. तर 10वी ते 12वीचे वर्ग ऑफलाईन (offline) पद्धतीने सुरू राहणार आहे. रविवारी (Sunday) संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान, आपत्कालीन सेवा वगळता सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या काळात आपत्कालीन सेवा (Emergency service) वगळता सर्व बाजार आणि कार्यालये बंद राहणार आहे.
मंगळवारी तामिळनाडूमध्ये कोरोनाचे 2,731 नवीन रुग्ण आढळून आले होते. तर 9 जणांचा मृत्यू (death) झाला होता. तामिळानाडूमध्ये कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 27 लाख 55 हजार 587 झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 412 झाली आहे. राज्यात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 121 रुग्ण आढळले आहेत.