बीड : बीडमध्ये एसटी बसचा (st bus) भीषण अपघात (accidents) झाला. लातूर- अंबाजोगाई (latur – anbajogai) रोडवर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले. ही घटना आज रविवारी (Sunday) सकाळी लातूर-अंबाजोगाई रोडवर घडली. सकाळच्या सुमारास दाट धुके होते आणि गाडीचा वेगही अधिक होता. त्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
लातूर औरंगाबाद (latur – aurangabaad) ही बस लातूर घेऊन निघाली होती तर प्लास्टिक पाईप (plastic pipe) घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई येथून लातूरकडे जात होता. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात बसचे वाहक चंद्रशेखर मधुकर पाटील (वय ३६) रा. कांचनवाडी औरंगाबाद, प्रवासी आदील सलीम शेख (वय २९) रा.अंबाजोगाई, नलिनी मधुकरराव देशमुख (वय ७२) रा. ज्योती नगर औरंगाबाद व इतर अनोळखी एक असे चार जण ठार झाले. सुंदरराव ज्ञानोबा थोरात (वय ५०) रा. पांगरी (ता.केज), हरिनाथ रघुनाथ चव्हाण (वय ६७), असमत फहीम पठाण (वय ३८), जियान फहीम पठाण (वय १०), भागवत निवृत्ती कांबळे (वय ५५), योगिता भागवत कदम (वय ४०), संगीता बजरंग जोगदंड (वय ४४), अय्यान फहीम पठाण (वय १३) हे सर्व रा. लातूर, अल्लाउद्दीन अमीर पठाण (वय २०), दस्तगीर अय्युब पठाण (वय १९) हे दोघे रा.निलंगा, प्रकाश जनार्दन ठाकुर (वय ५५) रा. शेंदी, सुभाष भागवत गायकवाड (वय ४३) रा. पिंपळगाव, माधव नरसिंगराव पठारे (वय ६५) रा. जालना, बळीराम संभाजी कराड (वय २२) रा. खोडवा सावरगाव अशी जखमींची (injured) नावे आहेत.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आज सकाळी लातूर-अंबाजोगाई रोड वर ते बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यात सहाजणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण जखमी झालेत. लातूर औरंगाबाद ही बस लातूर घेऊन निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई येथून लातूरकडे जात होता. अपघाताचे काही फोटोज आणि व्हिडीओज (videos) समोर आले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओज पाहून हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.
बर्दापूर (bardapur) फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. दरम्यान लातूर औरंगाबाद ही बस लातूर घेऊन निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. मात्र हा अपघात इतका भीषण होता की जागीच सहा जणांचा मृत्यू झालाय आण इतर गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताचा स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली.
जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती (information) मिळू शकलेली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास दाट धुके होते आणि त्यासोबतच गाडीचा वेगही अधिक होता त्यामुळे हा अंदाज झाला असावा असं बोललं जात आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बस आणि ट्रकचा एक-एका भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी (Traffic jams) सुद्धा झाली आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजुंना वाहनांच्या (vehicles) रांगाच रांगा (line) लागल्याचं पहायला मिळत आहे. अपघातानंतर दोन्ही गाड्यांचा चेंदामेंदा झाला. एसटी बसमध्ये प्रवासी आणि एसटी चालक (st driver) अडकला होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी चक्क क्रेन (Crain) बोलवावा लागला. क्रेनच्या सहाय्याने गाडी बाजुला करुन आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणि एसटी चालकाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.