अकलूज : सासरी झालेल्या भांडणामुळे 25 वर्षीय विवाहित (married women ) महिला शंकरनगर येथे माहेरी आली. शनिवारी (दि.8 ) तिच्या पतीने (husband) विषारी औषध (poison) घेवून अत्महत्येचा (suicide) प्रयत्न केला. तो हॉस्पिटलमध्ये (hospital) मृत्यूशी झुंज देत असतानाच पंचवीस वर्षीय पत्नीने (wife) अज्ञात कारणावरुन अकलूज येथे बोरावके पेट्रोल पंपासमोरील शेतात लिंबाच्या झाडाला साडीने गळफास (strangulation) घेवून अत्महत्या (suicide) केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीवर उपचार चालू आहेत.
याबाबत पोलीस (police) सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, ऊदयनगर (ता.माळशिरस malshiras) येथे रावसाहेब रंगनाथ आंधळे हे ४५ वर्षीय ऊसतोड कामगार पत्नी, मुलगा, सून यांचेसह वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी पुष्पलता हिचा विवाह नऊ वर्षांपूर्वी भोडणी (ता. इंदापूर indapur) येथील राजेंद्र हांगे यांच्यासोबत झाला होता.
तिला 8 व 6 वर्षे अशी दोन अपत्ये आहेत. 15 दिवसांपूर्वी मुलगी पुष्पलता (pushplata) हिने फोन (phon) करुन संशयाच्या कारणावरुन घरी भांडण झाल्याचे सांगत बोलावून घेतले. वडील रावसाहेब व भाऊ अजिनाथ हे तिच्या सासरी भोडणी येथे जावून मुलीला ऊदयनगर (udaynagar) येथे घरी घेवुन आले होते.
शनिवार, 8 जानेवारी रोजी जावई राजेंद्र हांगे याने त्यांचे राहते घरी विषारी औषध प्राषण केले. त्याच्या घरच्या लोकांनी उपचारासाठी अकलूज (akluj) येथे खाजगी रुग्णालयात (private hospital) दाखल केले.
नवरा विष पिल्याचे समजल्यानंतर मुलगी पुष्पलता ही दुपारी 1 च्या सुमारास घरातून निघून गेली. तिचा शोध घेतला तरी ती मिळून आली नाही. लहान मुलाच्या ओढीने मुलगी भोडणी येथे सासरी ( Father-in-law) गेली असावी म्हणून वडील रावसाहेब हे दि, 9 रोजी मुलासह भोडणी येथे जावून तेथेही शोध (search) घेतला. पण तेथेही ती मिळून आली नाही.
त्यानंतर माघारी येत असताना ओळखीच्या इसमाने मुलगी पुष्पलता हिने अकलूज येथील बोरावके पेट्रोल पंपासमोर (boravke petrol pump) गिरमे यांचे शेतात अंगावरील साडीने गळफास घेतल्याचे सांगितले. तिला सरकारी दवाखान्यात उपचारासाठी घेवून गेल्याचे सांगितले. सरकारी दवाखान्यात जावून पाहिल्यानंतर मयत ही मुलगी पुष्पलता असल्याची ओळख पटली आशा आशयाची फिर्याद रावसाहेब आंधळे यांनी अकलूज पोलीसात दाखल केली आहे. त्यावरुन अकलूज पोलिसात गुन्हा (crime) नोंद झाला आहे. पुढील तपास पठाण हे करीत आहेत.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ विद्यार्थिनीचा विनयभंग, रिक्षा चालकाविरुद्ध पोक्सोचा गुन्हा
सोलापूर – शाळा (school ) सुटल्यानंतर रिक्षातून प्रवास करताना एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग (Debauchery) केल्याची घटना काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कुमठा नाका (kumtha naka ) परिसरात घडली. त्या घटनेच्या जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीचा पालकास आरोपी रिक्षाचालक आणि त्याच्या आई वडिलांनी मारहाण केली. या प्रकरणात एमआयडीसीच्या पोलिसांनी रिक्षा (riksha) चालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शोएब रमजान शेख ( रिक्षाचालक), त्याचा भाऊ सोहेल, आई बिल्कीस, आणि वडील रमजान शेख (सर्व रा. शिवगंगा नगर, नई जिंदगी) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ती अल्पवयीन मुलगी शाळेतून घराकडे रिक्षातून येताना रिक्षाचालकाने तिच्याशी असभ्य वर्तन (Rude behavior) करून तिला धमकी (threatening) दिली होती. तिने घरी जाऊन हा प्रकार सांगितली.
त्या वेळी मुलीच्या वडिलांनी रिक्षाचालकाला जाऊन विचारणा केली. त्यानंतर रिक्षा चालक आणि त्याच्या घरातील लोकांनी मुलीच्या वडिलांना मारहाण केली. तशी नोंद एमआयडिसी पोलिसात (midc police) झाली. सहाय्यक निरीक्षक पेटकर पुढील तपास करीत आहेत.