सोलापूर : 900 वर्षाची परंपरा असलेल्या सोलापूरचे (solapur) ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महायात्रेला आजपासून सुरू होणार असून 68 लिंगांना तैला अभिषेक करण्यात येणार आहे.
उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यात काल मंगळवारी रात्री बारा वाजता मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजास सांज चढवण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर राजशेखर हिरेहब्बू व राजशेखर देशमुख यांच्या हस्ते नंदीध्वजांचा पूजा करण्यात आली. आज बुधवारी सकाळी आठ वाजता सात नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिरात नेऊन ठेवण्यात आला.
सकाळी 11 वाजता सिद्धेश्वर मंदिरातील अमृत लिंगा जवळ विडा देण्याचा कार्यक्रम होईल मंदिरातील गाभाऱ्यात महापूजा (Mahapuja) झाल्यानंतर ६८ लिंगांना योग दंडाच्या साक्षीने तैला अभिषेक (Taila Abhishek) करण्यात येणार आहे 13 जानेवारी रोजी संमती कट्ट्याजवळ सात नंदीध्वज याच्या साक्षीने अक्षता सोहळा होईल. 14 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता हळद काढण्याचा कार्यक्रम होईल संध्याकाळी होम मैदानावर होम विधीचा कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर फडकुले सभागृह जवळ भाकणूकीचा कार्यक्रम होईल. 16 जानेवारी रोजी दक्षिण कसब्यातील देशमुख यांच्या वाड्यात योग दंडाच्या पूजनाने धार्मिक विधीची सांगता होईल. रात्री दहा वाजता नंदीध्वजांचा वस्त्र विसर्जन कार्यक्रम होईल. त्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे अशी माहिती मानकरी राजशेखर हिरेहब्बू (rajshekhar Hirehabbu) यांनी दिली.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ सिध्देश्वर मंदिर परिसरात संचारबंदी
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा सुरु झाली असून, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे सध्या विविध निर्बंध (Miscellaneous restrictions) घालण्यात आले आहे. आज बुधवार, 12 जानेवारी रात्री 12 वाजल्यापासून ते रविवार 16 जानेवारी 22 च्या रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर परिसरात संचारबंदीचे आदेश पोलीस आयुक्त (police Commissioner) हरिष बैजल यांनी काढले आहेत.
कोरोनामुळे यंदाही ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज (Village God Siddheshwar Maharaj) यात्रेसाठी फक्त 50 जणांना परवानगी देण्यात आली आहे. या सर्व मानकऱ्यांना विशेष पास देण्यात येणार आहेत. तसेच मंदिर परिसरातील रहिवाशांनाही विशेष पास देण्यात येणार आहेत. यासाठी राहिवाशांनी पुराव्यासह संबंधित पोलीस (police) ठाण्याकडून पासेस प्राप्त करून घ्यावेत, असे आदेशात नमूद आहे. शिवाय शासनाच्या बतीने संबंधित ठिकाणी सेवा बजाविणाऱ्यांनी स्वतःचे ओळखपत्र (ID card) सोबत ठेवावे, या भागात अत्यावश्यक सेवा (essential service) बजाविणारे व्यक्ती व शासकीय वाहनांना प्रवेशास परवानगी (permission) असणार आहे.
Siddheshwar Yatra: Today, anointing 68 lingas, curfew in Siddheshwar temple area
दर्शनासाठी पासधारक (Pass holder) भाविकांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेतच येणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये मंदिर परिसरात परवानगीव्यतिरिक्त इतरत्र नंदीध्वज मिरवणूक, पालखी मिरवणूक ( Palkhi procession) , बाद्यपथक आदींना मनाई असणार आहे.
– परिसरातील अत्यावश्यक सेवा आस्थापना वगळता सर्व दुकाने बंद
होम मैदान (home maidan) येथील मॉर्निंगवॉक (morning walk), मैदानी खेळ, सराव, सेल्फी पॉइंट वगैरेकरिता मैदान बंद राहणार आहे. या परिसरातील अत्यावश्यक सेवेच्या आस्थापना वगळून इतर सर्व दुकाने बंद राहतील. मंदिर परिसरात मनोरंजन व करमणुकीचे संबंधित दुकाने खाद्यपदार्थ, पूजा साहित्य ( विक्री वगैरे दुकानांना परवानगी नसल्याने संबंधित दुकानदारांना परिसरात प्रवेशबंदी असेल, मंदिरातील (tempal) दैनंदिन पूजा-अर्चा, धार्मिक विधी इत्यादीबाबत पुजायांना मर्यादित संख्येमध्ये प्रवेशास परवानगी असेल. त्याबाबत संबंधित पोलीस ठाणेकडून प्रवेश पास घेणे बंधनकारक असेल.
• हा रस्ता सर्वांसाठीच बंद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( dr. Babasheb anbedkar) पार्क चौक, मंगळवेढेकर इस्टिट्यूट कॉर्नर, ह. दे. प्रशाला समोरील रस्ता, स्ट्रिट रोड, सिध्देश्वर कन्या प्रशालासमोरील रस्ता, वनश्री नर्सरी, विष्णू घाट, गणपती घाट, सरस्वती कन्या प्रशाला, भुईकोट किल्ल्याच्या आतील परिसर, चार पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक, park chouk) अशा ठिकाणांसह आतील सर्व परिसरात संचारबंदी (carfu) आदेश लागू राहील. यामुळे हा मार्ग नागरिकांना रहदारीसाठी वापरता येणार नाही.