Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मित्राचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; करमाळ्यात निवृत्त पोलीस अधिका-याला भावानेच फसवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मित्राचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; करमाळ्यात निवृत्त पोलीस अधिका-याला भावानेच फसवले

Surajya Digital
Last updated: 2022/01/12 at 6:36 PM
Surajya Digital
Share
7 Min Read
SHARE

सोलापूर : मित्राबरोबर पत्नीचे अनैतिक संबंध (Immoral relations) असल्याचा संशय घेऊन त्याचा खून (killing) करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश (District and Sessions Judge) आर. एन. पांढरे यांनी ठोठावली.

महादेव नागप्पा भैरामडगी (रा. केगाव खुर्द, ता. अक्कलकोट) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे  (Accused) नाव आहे. इरण्णा विरुपाक्ष बगले (वय ५०, रा. केगाव खुर्द) याला आरोपी महादेव भैरामडगी याने त्यांच्या घरी जाऊन त्यांची पत्नी सविता हिच्याबरोबर झालेले भांडण मिटवायचे आहे असे सांगून मोटारसायकल (motorcycle) वरून त्याला संजवाड येथे नेले. आरोपीने इरण्णा यास त्यांच्या चुलत सासऱ्याच्या घरी नेले. त्यानंतर ते मृताच्या सासऱ्याचे घरी गेले. त्यावेळी सविताचा जोरात ओरडण्याचा आवाज (voice) आला. त्यानंतर आरोपी

भैरामडगी हा मोटारसायकलवरून वेगात निघून गेला. इरण्णा हा रक्ताच्या थारोळ्यात जनावर बांधण्याच्या गोठ्यात पडला होता. मंद्रूप पोलिसांनी भैरामडगी यास पोलीस (police) ठाण्यास आणल्यानंतर त्याने इरण्णा व सविता यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन त्यास लाकडी दांडक्याने मारल्याचे सांगितले.

या खटल्यात सरकारतर्फे एकूण दहा साक्षीदार तपासले. फिर्यादी विरुपाक्ष बगले, डॉक्टर व फौजदार गणेश पिंगुवाले यांची साक्ष महत्त्वाची ठरली. यामध्ये सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद (Argumentation)  ग्राह्य धरुन आरोपीस जिल्हा न्यायाधीश पांढरे यांनी जन्मठेपेची शिक्षा व दोन हजारांचा दंड ठोठावला. यात सरकारतर्फे अ‍ॅड. माधुरी देशपांडे व आरोपीतर्फे अ‍ॅड. राजेंद्र बायस व कोर्टपैरवी म्हणून सहायक फौजदार विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले.

Accused of killing a friend sentenced to life imprisonment; In Karmala, a retired police officer was cheated by his brother

□ घरात बोलावून पोलिस निरीक्षकाने केला महिलेचा विनयभंग

सोलापूर – एका महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा पुण्यात दाखल असताना त्याच महिलेस सोलापुरातील घरात बोलावून  विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक (police inspector) चंद्रकांत भगवान माने  ( रा. मधुबन सोसायटी, विजापूर रोड सोलापूर) याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे .

ती पीडित महिला पुण्यात राहण्यास असताना चंद्रकांत माने यांनी तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून अत्याचार केला होता. त्यानंतर लग्नास विरोध दिल्याने त्या महिलेने पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात  त्यांच्या विरुद्ध सप्टेंबर २०२० मधे तक्रार दिली होती.पुणे पोलिसांनी चंद्रकांत माने (chandrkant mane) यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा देखील दाखल केला होता.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

ती महिला अक्कलकोट (akkalkot) परिसरात तिच्या मुलीला भेटण्यासाठी आली होती. पोलिसात तक्रार देण्यासाठी ओळख (identify) पाहिजे म्हणून तिने माने यांना फोन केला.  तेव्हा माने यांनी परत जाताना सोलापुरातील घरी ये. आपण पूर्वीच्या दाखल गुन्ह्याबद्दल चर्चा करू, असे तिला सांगितले. होते त्याप्रमाणे ती महिला २६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास सोलापुरातील मधुबन (madhuban) सोसायटीत चंद्रकांत माने यास भेटण्यास आली.  तेव्हा माने यांनी तिच्याशी असभ्य वर्तन करून विनयभंग केला. असे तिने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

□ मळोलीत चोरट्यांचा धुमाकूळ दोन दुकाने, एक हॉटेल फोडलं

वेळापूर : माळशिरस तालुक्यातील मळोली येथे चोरट्यांनी एकाच रात्रीत एक हॉटेल (hotel), दोन दुकाने (shops) फोडून पाच लाख २४ हजाराचा ऐवज चोरुन नेला आहे. तसेच गावात घरासमोर लावलेल्या दोन मोटारसायकलीही चोरून नेल्या आहे.

या घटना दहा तारखेच्या रात्री घडल्यात. मळोली येथील साळमुख चौकात असलेल्या राहुल हॉटेलच्या खिडकीच ग्रील तोडून चोरट्यांनी १७ हजाराची रोकड व विविध कंपन्यांच्या दारुच्या बाटल्या असा ४१ हजाराचा ऐवज चोरून नेला आहे.

तसेच गावातील प्रवीण दशरथ मगर यांच मोटार रिवायडींग (rivaiding) व स्पेअर पार्ट (spears part) विक्रीचे दुकान फोडून दुकानातील ६० हजाराची रोकड साहित्य असा जवळपास चार लाखाचा ऐवज चोरुन नेला. तसेच त्यांचे चुलत बंधू नवनाथ मगर यांच हार्डवेअरच (hardweare) दुकान फोडून चोरट्यांनी ३४ हजाराची रोकड व ऐवज असा ८३ हजाराचा माल चोरु नेलायं. तसेच गावातील दोन घरासमोर लावलेल्या मोटारसायकली चोरुन नेल्या आहेत.

□ भावाने बनावट सह्या करून केला ९६ लाखांचा अपहार

– निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची करमाळ्यात तक्रार

करमाळा : सख्ख्या भावाने कोणत्याही संमतीशिवाय खोट्या व बनावट सह्या करून रोखीने तसेच इतर खात्यावर वळवून तब्बल ९६ लाख ३९ हजार रुपयांच्या रकमेचा अपहार  केला असल्याची फिर्याद निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मालोजी पाटील (ACP maloji patil) यांनी करमाळा पोलिसात (karmala police) नोंदविली आहे.

फिर्यादी पाटील हे मूळचे केत्तूर क्रमांक दोन येथील आहेत. सध्या ते बालेवाडी (पुणे pune) येथे राहतात. केत्तूर दोन भागात त्यांच्या कुटुंबाची वडिलोपार्जीत ८० एकर शेती आहे. त्यांचे वडील माधवराव खाटमोडे हे लहान भाऊ लखोजी खाटमोडे यांच्यासोबत गावी राहतात. त्यांच्या शेतीच्या वाटण्या झालेल्या नाहीत. दरम्यान फिर्यादीच्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Central Co-operative Bank) , शाखा केत्तूर नंबर दोन येथील खात्यातील रकमेचा अपहार २०११ ते २०१९ या कालावधीमध्ये वेगवेगळया तारखेला एकूण २३ व्यवहारातून भाऊ brother आणि वडील father यांनी केल्याचा आरोप  करण्यात आला आहे.

मे २०२१ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर गावी शेतीपूरक व्यवसाय सुरु करण्यासाठी व्यावसायिकांकडे माहिती घेतल्यावर अनामत रक्कम भरावी लागत असल्याने फिर्यादीने बँकेत चौकशी केली असता खात्यावर अंदाजे सहा लाख रुपये रक्कम असल्याचे सांगितल्याने संशय आला. त्यामुळे २०११ पासून बँकेचे स्टेटमेंट (Bank statement) घेतले असता २०११ ते २०१९ या कालावधीत वेगवेगळ्या तारखेला खात्यावरून एकूण २३ व्यवहार खोट्या व बनावट सह्या करून झालेले आढळले. त्यात पैशाचा अपहार केल्याचे दिसून आले, असा उल्लेखही फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.

शेतात उसाचे पीक घेतले जाते. उसाचे कारखान्यावरुन निघालेले बिल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, केत्तूर शाखा आणि बँक ऑफ इंडिया (Bank of India) शाखा कोर्टी येथे जमा होत असे. पोलीस दलात (police force) काम करीत असताना दैनंदिन कामाच्या व्यस्ततेमुळे गावी येणे, जाणे कमी होत होते.

या पार्श्वभूमीवरच हा अपहार झाला असून अपहार केलेल्या रकमेतून भावाने बारामती येथे सदनिका खरेदी केली, वीस ते पंचवीस एकर जमीन खरेदी केल्याचे, तसेच अंदाजे ५० ते ६० तोळे सोने, चारचाकी गाडी खरेदी केली. अपहार केलेल्या रकमेतील रक्कम काहींना घर बांधण्यासाठी दिल्याचे खात्रीशीर समजले आहे, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

You Might Also Like

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

उजनीतून ३७ लाख युनिट वीजनिर्मिती

TAGGED: #Accused #killing #friend #sentenced #life #imprisonment #Karmala #retired #policeofficer #cheated #brother, #मित्र #खून #आरोपी #जन्मठेप #करमाळा #निवृत्तपोलीस #अधिकारी #फसवले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुभाष देशमुख पोहचले शिवदारेंच्या बांबू बनात; राजकारणात कोण कोणाला कधी बांबू लावेल !
Next Article सोलापूरच्या ‘व्हिल्स’च्या दोघांची राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

Latest News

कपिल शर्माच्या हॉटेलवरील हल्ल्यात खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात
देश - विदेश July 11, 2025
अमेरिकेकडून लेखी हमी मिळेपर्यंत अणु चर्चा नाही -इराण
देश - विदेश July 11, 2025
गुजरात पूल दुर्घटना : मृतांचा आकडा १७ वर तर ३ जणांचा शोध अजूनही सुरू, ४ अधिकारी निलंबित
देश - विदेश July 11, 2025
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?