सोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात आजच्या अहवालानुसार नऊ मृत्यू तर 311 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. एकट्या पंढरपुरात 115 रुग्णांची नोंद झाली. आजच्या अहवालानुसार 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ग्रामीण भागात आता एकूण मृत्यू 153, बाधित 5 हजार 186 तर कोरोनामुक्त 3 हजार 43 रुग्णांची नोंद झाली आहे.
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी उशिरा मिळालेल्या रिपोर्टनुसार 311 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 98 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी आज शनिवारी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात 3126 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 311 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2815 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 311 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 177 पुरुष आणि 134 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 हजार 186 झाली आहे.