मुंबई : महाराष्ट्रात (maharashtra) कोविड संसर्ग (Covid infection) सुरु झाल्यापासून आतापर्यंत 265 पोलिसांचा (police) कोरोनामुळे मृत्यू (death) झाला आहे. यात मुंबई पोलिसांची (mumbai police ) संख्या सर्वाधिक आहे, जिथे आतापर्यंत 126 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर ठाणे पोलिसांत 37, नागपूर nagpur 25, पुणे pune 20, अहमदनगर ahamadnagar 17, गडचिरोली gadchiroli 16, नवी मुंबई new mumbai आणि नाशिक nashik पोलिसांत 12-12 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात आरोग्य अधिकारी health officer, कर्मचाऱ्यांसोबतच साथीशी दोन हात करत दिवसरात्र, रस्त्यारस्त्यावर उभ्या ठाकलेल्या पोलिस दलालाही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आजवर 265 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 126 पोलीस हे मुंबईतील आहेत.
जेव्हा लॉकडाऊनची घोषणा (lockdown declared झाली तेव्हापासून पोलीस निर्बंधांची कडक अंमलबजावणी Strict enforcement करण्यासाठी रस्त्या रस्त्यावर उभे ठाकले होते. या पोलिसांनी अनेकदा नागरिकांच्या रोषालाही बळी पडावे लागले. Shocking! Corona kills 265 policemen in Maharashtra so far
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यातच पोलिसांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा देखील झाली. दोन लाटा आणि सध्या सुरु असलेली कोरोनाची तिसऱ्या लाटेत हजारो पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या राज्यभरात 2,145 पोलीस उपचार घेत आहेत.
बुधवारी प्रशिक्षण व खास पथक विभागाचे आयजी रवींद्र सेनगावकर ( IG ravindr sengonkar) याच्यासह सहायक महानिरीक्षक रमेश धुमाळ ramesh dhumal, शीला साईल हे अधिकारी तसेच वरिष्ठ कार्यालयीन अधीक्षक, स्टेनो व ऑर्डरली यांना मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.
मुंबई पोलीस दलात बुधवारी नव्याने 164 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 35 पोलिसांना दुसऱ्यांदा लागण झाली. या सर्वांना सौम्य लक्षणे आहेत. मुंबई पोलीस दलात 71 जण 4 जानेवारीला कोरोना पॉझिटिव्ह positive आले होते तर 10 व 11 जानेवारीला ही संख्या 126 व 164 पर्यंत वाढली.
आतापर्यंत एकूण 887 पोलीस कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी 662 होम क्वारंटाईन आहेत तर 130 जण कोविड सेंटरमध्ये आणि 95 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामध्ये ओमायक्रोनचा Omicron एकही रुग्ण नाही. मुंबई पोलीस दलात 39,089 जणांचा पहिला, तर 35,711 जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.