Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबईतील युवकासह मच्छिमार उजनी धरणात बुडाले, शोध मोहीम सुरू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मुंबईतील युवकासह मच्छिमार उजनी धरणात बुडाले, शोध मोहीम सुरू

Surajya Digital
Last updated: 2022/01/14 at 7:37 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर / करमाळा : करमाळा (Karmala) तालुक्यातील चिखलठाण येथे उजनी धरणात फिरण्यासाठी गेलेल्या मुंबई येथील युवकासह एक मच्छिमार असे दोघे बुडाले. आजच्या संक्रांत सणादिवशी (Sankranti Festival) ही दुर्घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

इकबाल शेख (वय 18, रा. मुंबई) असे त्या युवकाचे तर येथील समीर याकूब सय्यद असे मच्छिमाराचे नाव आहे. उजनी धरणात (Ujani Dam) फिरण्यासाठी गेलेल्या मुंबई (Mumbai) येथील युवकासह एक मच्छिमार (Fisherman) असे दोघे बुडाले. आज शुक्रवारी (ता. 14) सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. गावातील तरुण व मच्छीमारांनी शोध मोहीम सुरू केली आहे. वार्ता मिळताच पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ व मच्छिमारांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.

चिखलठाण (ता. करमाळा) येथे उजनी धरणात फिरण्यासाठी गेलेल्या मुंबई येथील युवकाचा होडीतून तोल (Balance) गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मच्छीमार तरुणाने उडी मारली. बुडणाऱ्याने मच्छीमाराला मिठी मारल्याने दोघेही बुडाले. Fishermen with youth from Mumbai
Drowned in Ujani dam, search operation started

येथील समीर याकूब सय्यद हा उजनी धरणात मासेमारीचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे मुंबई येथील पाहुणे आले होते. सकाळी नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी उजनी धरणात निघाले असताना मुंबई येथील चार पाहुणे त्याच्यासोबत फेरफटका मारण्यासाठी गेले. धरणातील पाण्यात फेरफटका मारताना अल्ताफ इकबाल शेख या युवकाचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

त्याला वाचवण्यासाठी समीर याने पाण्यात उडी मारली. समीर मासेमारी करणारा पट्टीचा पोहणारा होता; मात्र अल्ताफने त्याला मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले. होडीतील इतरांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे मच्छीमार आले. तोपर्यंत दोघे बुडाले होते. मच्छीमारांनी शोध सुरू केला आहे.

घटनास्थळ गावापासून जवळच असल्याने गावातील लोक मोठ्या प्रमाणावर जमले. या परिसरातील दहीगाव (Dahigaon), चिखलठाण (Chikhalthan), केडगाव (Kedgaon), कुगाव (Kugaon) परिसरातील मच्छीमार येऊन वडापच्या मदतीने त्यांचा शोध घेत आहेत; परंतु त्यांना यश आले नाही. तरीही गावातील तरुण व मच्छीमारांनी शोध सुरूच ठेवला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, स्थानिक ग्रामस्थ व मच्छीमारांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.

□ ट्रॅक्टरच्या धडकेने रस्ता ओलांडणारा विवाहित तरुण ठार

सोलापूर – वेगाने जाणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या (tractor) धडकेने रस्ता ओलांडणारा विवाहित तरुण जागीच ठार झाला. हा अपघात   गुरुवारी (ता. 13) सायंकाळच्या सुमारास बुधवार पेठेतील नरवीर तानाजी चौकात घडला. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर साहित्य पळून जात होता. त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी  पाठिलाग करून त्याला पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले. A married young man was killed when a tractor hit him

विजय रामचंद्र साबळे (वय २८ रा. बुधवार पेठ, जय मल्हार चौक) असे मयताचे नाव आहे. ते गुरूवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नरवीर तानाजी चौकातून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी पुणे नाका येथून कारखान्याच्या दिशेने जाणारा ट्रॅक्टर समोरून धडकला. त्यात ते चाकाखाली सापडून जागीच मयत झाले. मयत विजय साबळे हे विवाहित असून त्यांच्या पश्चात आई, २ बहिणी, पत्नी,२ मुली आणि १ मुलगा असा परिवार आहे. ते मजुरी करीत होते. अशी माहिती मयताच्या नातेवाइकांनी दिली. या अपघाताची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे .

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #मुंबई #युवक #मच्छिमार #उजनीधरण #बुडाले #शोधमोहीम
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुट्टी जाहीर : 18 जानेवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
Next Article सोलापुरात सुरू होणार दहावी, बारावीचे क्लासेस पालकमंत्र्यांच्या सूचना

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?