सोलापूर : बनावट सातबारा उतारा तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणाविरुद्ध सदर बझार पोलीस (sadar bzar police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुखदेव भीमा राठोड, माजी महापौर विठ्ठल करबसू जाधव (ex mayor vittal karbasu jadhav) व त्या वेळचे तत्कालीन तलाठी व मंडल अधिकारी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
२००४ ते २००७ या कालावधीमध्ये बनावट सातबारा उतारा खोटा आहे हे माहीत असताना देखील तो खरा आहे म्हणून वापर करून प्लॉटची खरेदी सुखदेव राठोड व संशयित आरोपी विठ्ठल जाधव यांच्याकडून दस्त क्रमांक ६२६८/ २००४ प्रमाणे रजिस्टर खरेदी खत लिहून घेऊन विठ्ठल जाधव यांनी जागेच्या सातबारा स्वतःचे नाव लावून घेतले.
त्यामुळे संशयित आरोपी सुखदेव राठोड व विठ्ठल जाधव तसेच त्यावेळचे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी शासनाची फसवणूक केली आहे, अशा आशयाची फिर्याद चंद्रकांत काशीनाथ हेडगिरी ( वय – ४९ शिवरत्न नगर, वसुंधरा कॉलेज जवळ, सोलापूर) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा तपास पोसई गायकवाड हे करीत आहेत. Fake Satbara Utara; Four persons, including a former mayor, have been booked
■ फेसबुकवरील मैत्री करमाळ्यातील लॉजवर रंगली, इतर मित्रांनीही केला अत्याचार
करमाळा : करमाळा तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फेसबुकवरून एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. त्या दोघांनी मिळून जेऊर (ता. करमाळा Karmala) येथील साई लॉजमध्ये (sai lodge) भेटण्याचे ठरवले. त्यावेळी संशयित आरोपी सलीम रहिमसाब सगरी (वय २१) याने रूम बुक करून त्या मुलीला रूम नंबर ३०१ मध्ये नेले व तिच्यावर अत्याचार केला. आणि आपल्या इतर दोन मित्रांनाही अत्याचार करण्यासाठी बोलावून घेतले. तेंव्हा मुलीने आरडाओरड केल्याने प्रकरण पोलिसांत पोहोचले.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
याबाबत अधिक माहिती अशी की, सगरी याने अत्याचार केल्यानंतर त्याने खाली असलेले आपले दोन मित्र सौरभ दिनेश बनसोडे (वय २०) व अर्जुन बापूराव रणदिवे (वय ३२, सर्व रा.जेवळी, ता. लोहारा, जि.उस्मानाबाद) या दोघांना खोलीत बोलावून त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुलीने आपली फसवणूक (cheating) झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरडाओरड केली.
नंतर लॉजमध्ये गोंधळ झाल्यानंतर तेथील आजूबाजूच्या लोकांच्या हा प्रकार लक्षात आला. तोपर्यंत अत्याचार करणारे तिघे घटनास्थळावरून पसार झाले. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलीला धीर देऊन गुन्हा दाखल करून घेतला व सर्व आरोपींना २४ तासांच्या आत अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना आठ दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीकडे संबंधित मुलाचा केवळ मोबाईल नंबर होता. तो राहतो कुठे, व्यवसाय काय करतो, याची काही माहिती नव्हती. केवळ फेसबुकवर मैत्री झाली होती. पोलिसांना तपास करणे फार अवघड होते. मोबाईल नंबरच्या आधारे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी त्यांचे लोकेशन निश्चित केले व आरोपींना २४ तासांच्या आत जेरबंद करून करमाळ्याच्या तुरुंगात टाकले. The friendship on Facebook spread to the lodge in Karmala, other friends also committed atrocities
■ मोराची शिकार करणाऱ्याला करमाळ्यात अटक
सोलापूर – करमाळा तालुक्यातील कोढेज गावाजवळ एका मोराची शिकार करण्यात आली असून, शिकाऱ्याला वनरक्षक विभागाने ताब्यात घेतले आहे. बारक्या बबलू काळे असे ताब्यात घेतलेल्या शिकाऱ्याचे नाव असून, मृत मोर व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
करमाळा तालुक्यातील जेऊरवाडी-
कोढेज रस्त्यावर तीनजण मोराची शिकार करून दुचाकीवरून पळून जात असल्याचे गावकऱ्यांनी आज सकाळी पाहिले. प्रसंगावधन राखत गावकऱ्यांनी त्यांतील बारक्या काळे (रा. जेऊरवाडी) याला पकडले व दोघे पळून गेले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. घटनास्थळी येऊन पोलिसांनी आरोपी काळे याला ताब्यात घेत मृत मोर व दुचाकी जप्त केली आहे. Peacock hunter arrested in Karmala
काळे याला वनरक्षक विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून, दोघांचा शोध सुरू आहे. या परिसरात मोर, हरिण, ससा आदी प्राणी मोठ्या प्रमाणावर असून, यापूर्वीही अनेक प्राण्यांची शिकार करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली आहे.