नवी दिल्ली : विराट कोहलीने (virat kohli) आज कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. आपण कर्णधारपदाचा राजीनामा (resignation) देत असल्याचे त्याने ट्विटरद्वारे जाहिर केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-1 अशा पराभवानंतर विराट कोहलीने भारतीय कसोटी कर्णधारपदाचा (Captaincy) राजीनामा दिला. प्रवासात कुठेतरी थांबा घ्यावा लागतो आणि कसोटी संघाचा कर्णधार म्हणून माझ्यासाठी तो क्षण आला आहे. असं कोहली म्हणाला.
विराट कोहलीने भारताच्या टेस्ट टीमचा (test team) राजीनामा दिला. विराटने टेस्ट टीमची कॅप्टन्सी सोडल्याचं ट्विट केलं, यानंतर 20 मिनिटांमध्येच बीसीसीआयने (BCCI) हे ट्विट (tweet) रिट्विट (retweet) केलं आणि विराटला धन्यवाद दिले. विराटच्या नेतृत्वात भारतीय टेस्ट टीम नव्या उंचीवर पोहोचली, याबाबत त्याचे अभिनंदन. विराट भारताचा सगळ्यात यशस्वी टेस्ट कर्णधार आहे, असं बीसीसीआय त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणालं आहे.
कसोटी संघाचे कर्णधारपद सोडताना विराट कोहलीने लिहिले, मी याबाबत अगदी स्पष्ट आहे आणि मी माझ्या संघाशी बेईमान होऊ शकत नाही. मला इतके दिवस माझ्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो. यासोबतच, मी माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी पहिल्या दिवसापासून माझ्या व्हिजनवर ( visions) विश्वास ठेवला. Breaking – Virat Kohli’s sudden resignation; Within 20 minutes of the resignation, the BCCI retweeted
कोहलीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरील संदेशात असे म्हटले आहे की, ‘भारतीय संघाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी सात वर्ष मेहनत केली. मी माझे काम अतिशय प्रामाणिकपणे केले आणि त्यात कोणतीही कसर सोडली नाही. पण प्रत्येक गोष्टीत केव्हा ना केव्हा थांबावे लागते. माझ्यासाठी कसोटी क्रिकेटचा कर्णधार म्हणून ती वेळ आज आली आहे. या प्रवासात अनेक चढ आणि काही उत्तर आले. पण या प्रवासात कधीच प्रयत्नात किंवा विश्वासात कमी पडलो नाही. मी नेहमी जे केले त्यात कायम माझे 120% देण्यावर विश्वास ठेवला आणि जर मी ती गोष्ट करू शकत नसेल तर ते योग्य नाही. माझ्या मनात या विषयी अतिशय स्पष्टता असून मी माझ्या संघासोबत अप्रामाणिक राहू शकत नाही.’ असे कोहलीने आपल्या सोशल मीडिया पोस्ट ( social media post ) मध्ये म्हटले आहे.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
विराट कोहलीने टी-20 चं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यामध्ये वाद सुरू होता. कोहलीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी कर्णधारपदाची सुरुवात केली. तेव्हापासून तो भारतीय संघाचा कर्णधार होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन ( keptown) कसोटी हा त्याच्या कर्णधारपदाचा शेवटचा सामना होता, ज्यात भारताचा सात विकेट्सनी पराभव झाला होता.
कोहलीचा कर्णधारपदाचा प्रवास यशस्वी मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ जगातील नंबर वन कसोटी संघ बनला. परदेश दौऱ्यांमध्ये संघाने सातत्याने चांगली कामगिरी केली. भारतीय संघ 2021 मध्ये पहिल्या कसोटी चॅम्पियनशिपच्या (championship) फेरीत पोहोचला होता. आकडेवारीनुसार, तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे.
2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर कोहली कसोटी कर्णधार बनला होता. तो टीम इंडियाचा कसोटीतील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने 68 कसोटींमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले असून त्यापैकी 40 कसोटी जिंकल्या आहेत. संघाला 17 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले तर 11 कसोटी अनिर्णित राहिल्या. दुसर्या क्रमांकावर एमएस धोनी आहे. ज्याने 60 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आणि त्यापैकी टीम इंडियाने 27 सामने जिंकले.