बार्शी : शेअर बाजारामधील गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांचा विश्वासघात आणि कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी विशाल फटे vishal Fateh याचे वडील, सहआरोपी अंबादास फटे, भाऊ वैभव फटे यांना शनिवारी अटक करून न्यायालयात court हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
जिल्हा व अति.सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. तीन वित्तीय संस्थांमधील गुंतवणूकीवर मोठ्य परताव्याचे आमिष दाखवून 11 कोटी 38 लाख रुपयांची गुंतवणूक investment करून घेवून नंतर गुंतवणुकीची रक्कम व परतावा न देता विश्वासघाताने फसवणूक केल्याप्रकरणी विशालका कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचा Vishalka Consultancy Services company संचालक मुख्य आरोपी विशाल अंबादास फटे याच्यासह त्याच्या कुटूंबियांवर दिपक अंबारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा crime दाखल झाला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने local criminal investigation branch संशयित सहआरोपी अंबादास फटे व वैभव फटे यांना सांगोला येथून ताब्यात घेवून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. शुक्रवारी (ता. 14 ) मध्यरात्रीनंतर त्यांना अटक करण्यात आली. शनिवारी (ता 15 ) बार्शी येथे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून फसवणूकीची रक्कम मोठी आहे.
अटक केलेल्या आरोपींचा गुन्ह्यातील संस्थामध्ये प्राथमिक सहभाग Primary participation असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या सहभागाबात तसेच फरार आरोपींचेबाबत तपास करायचा आहे. आरोपींनी संगनमताने आणखी कशाप्रकारे व कोठे फसवणूक केली आहे, अपहाराच्या रक्कमेची विल्हेवाट कशी लावली, याबाबत सखोल तपास करणे गरजेचे आहे. त्यामुळे अटक arrested आरोपींना 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांच्यावतीने करण्यात आली.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अतिरिक्त शासकीय अभियोक्ता Additional Government Prosecutor ऍड प्रदीप बोचरे यांनी यावेळी युक्तीवाद केला. यावेळी आरोपींनी आमचा या प्रकरणाचा काही संबंध नसल्याचा बचाव घेतला. न्यायालयाने उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकून 5 दिवसांची पोलीस कोठडी police custody मंजूर केली. यावेळी पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपस्थित होते. न्यायालय परिसरात आरोपींना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. Ambadas and Vaibhav Fateh to police custody; Big Bull’s escape from Barshi captured on CCTV
■ बिगबुलचं बार्शीतून पलायन सीसीटीव्हीत कैद
शेकडो लोकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा Corruption of crores of rupees घालून गायब झालेल्या विशाल फटेचे बार्शीतून झालेलं पलायन सीसीटीव्हीत कैद captured on CCTV झालं आहे. बार्शीतून बाहेर पडताना विशालने कोणत्या वाहनाचा वापर केला याबाबत चौकशी inquire केल्यानंतर तो आपल्या कुटुंबासह रेल्वेने गेल्याचे समोर आलं आहे.
या मार्गावरील सीसीटीव्ही चेक केल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालं. पोलिसांनी त्यास रेल्वे स्टेशनवर सोडविण्यास गेलेल्या नातेवाईकांकडे चौकशी सुरु केली आहे. मात्र त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. विशालचं हे पलायन त्या नातेवाईकांसाठीही अनपेक्षित होतं.
विशालने बार्शीतून Barshi जाताना पुण्यास असलेल्या मामाच्या आजारपणाचं कारण पुढं केलं होतं. त्यामुळे त्याच्या अचानक बाहेरगावी जाण्याचं त्याच्या मित्रपरिवार, सहकार्यांना आश्चर्य वाटलं नाही. जाताना त्याच्यासोबत पत्नी आणि लहान मूल होतं. मामाच्या आजारपणाचं कारण बाहेरच्यांसाठी असलं तरी जवळच्या नातेवाईकांसमोर मात्र दुसरंच कारण पुढं केलं गेलं. त्यामुळे त्यांना देखील पुसटशीही शंका doubt आली नाही. किंबहुना त्याच्या पत्नीलाही शेवटपर्यंत खरं कारण माहित नसावं, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
पत्नीकडील नातेवाईक शेतकरी कुटुंबातील आहेत. विशालचं कारस्थान आणि पत्नीसोबतचं पलायन escape हे त्यांच्यादृष्टीने भूकंपासारखंच आहे. निरक्षरतेमुळे घडलेल्या सर्व घडामोडीबद्दल ते अनभिज्ञ आहेत. त्या दोघांचा फोन बंद झाल्यानंतर खरा प्रकार उघडकीस येईपर्यंत ते ही साशांकित होते. आता तर त्यांच्यावर आभाळच कोसळले आहे. मुलीच्या काळजीनं त्यांना अन्न-पाणी गोड लागेनासं झालं आहे.
विशालची सासरवाडी बार्शीजवळच आहे. त्यामुळे सासुरवाडीकडील माणसांचं नेहमी घरी येणं-जाणं होतं. विशालचं लग्न तीन वर्षापूर्वी झालं आहे. त्याला दीड वर्षाची मुलगी आहे. त्याचे वडील आणि सासरकडील मंडळींनाही त्याची मोठ्या प्रमाणावर चाललेली उलाढाल पसंत नव्हती. शेअरबाजाराबाबत सर्वसाधारण लोकांचं असतं तसंच त्याचंही प्रतिकूल मत होतं.
मात्र विशाल बायकोला वेगवेगळ्या निमित्तानं देत असलेल्या किमती भेटवस्तूंमुळे ते ही मनातून सुखावून जायचे. आता मात्र त्याच्या या कुकर्तुत्वाने त्यांना ही समाजात तोंड दाखवायला जागा उरली नाही. त्याचबरोबर मुलीच्या सुरक्षिततेची चिंता भेडसावत आहे ती वेगळीच.