Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विशाल फटे स्कॅम : फसवणुकीची रक्कम गेली साडेअठरा कोटींवर, अलका फटेंवर पोलिसांचे लक्ष
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

विशाल फटे स्कॅम : फसवणुकीची रक्कम गेली साडेअठरा कोटींवर, अलका फटेंवर पोलिसांचे लक्ष

Surajya Digital
Last updated: 2022/01/17 at 12:27 PM
Surajya Digital
Share
8 Min Read
SHARE

बार्शी (सचिन आपसिंगकर): विशाल फटे स्कॅम (Vishal Fate scam) मध्ये तक्रारदारांची संख्या हळूहळू वाढत आहे. अजूनही मोठे गुंतवणूकदार समोर यायला तयार नाहीत. आपण अधिकृतरित्या तक्रार दिली तर विरोधक काळ्या पैशाच्या अनुषंगाने आपल्यावर बालंट आणतील अशी त्यांना भिती आहे. त्यामुळे रविवार Sunday सायंकाळपर्यंत 76 गुंतवणूकदारांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणूकीची रक्कम 18 कोटी 76 लाखावर गेली आहे.

सुरूवातीला 5 कोटी 63 लाख  रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल झाली होती. गुरूवारी रात्री हा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शुक्रवारी, शनिवारी व रविवारीही तक्रारींचा ओघ सुरूच होता. रविवारी सायंकाळपर्यंत एकूण  76 गुंतवणूकदारांनी फसवणूक झालेबाबत तक्रारी केल्या आहेत.

फटे स्कॅमच्या तपासावर वरिष्ठ अधिकारी जातीने लक्ष ठेवून आहेत. फसवणुकीची रक्कम मोठी असल्याने या गुन्ह्याच्या तपासासाठी अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव यांनी एसआयटी SIT (विशेष तपास पथक) स्थापन केले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधिक्षक संजय बोठे हे पथकाचे प्रमुख असून बार्शीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी विशाल हिरे, बार्शी शहरचे पोलीस निरीक्षक  police inspector रामदास शेळके, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण मिसाळ, बार्शी barshi शहरचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांचा या पथकात समावेश आहे. गुन्ह्यातील  आरोपींपैकी दोघांना अटक झाली असून प्रमुख आरोपी विशाल फटे अद्याप गायब आहे. त्याच्या तपासासाठी तपास पथके तयार करण्यात आली असून ती त्याचा शोध घेत आहेत.

□ नातेवाईकांपासून फटकून वागणार्‍या विशालची आईच होती सर्वात जवळ, अलका फटें वर पोलिसांचे लक्ष

बार्शी : आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त इतर कोणत्याही नातेवाईकांत न मिसळणार्‍या बिगबुल विशाल फटेला आईच सर्वात जवळ होती. वडिलांचा वारंवार विरोध स्वीकाराव्या लागणार्‍या विशालला आईच प्रारंभापासून पाठीशी घालत होती. वडील कुटुंबप्रमुख व एकमेव कमविते असले तरी घरात आईचाच शब्द अंतिम होता.

त्याच्या व्यवहाराची सर्वाधिक माहिती घरात आईलाच होती. त्याच्या मित्र परिवारालाही हे वारंवार जाणवत होते. आईचा शब्द तो खाली पडू देत नव्हता. म्हणूनच त्याच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात आई अलका फटे alka fate यांनाही सहअरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी अद्याप त्यांना अटक arrested केलेली नाही. मात्र विशाल तिला संपर्क करण्याची शक्यता असल्यामुळे पोलिस तिच्यावर लक्ष ठेवून आहेत.

वडिल अंबादास फटे हे मितभाषी आहेत. आपली नोकरी आणि कुटुंब यापलीकडे ते कधी गेलेच नाहीत. त्यांचे राहणीमान ही सर्वसाधारण आहे. कोणालाही शब्दानेही न दुखविणारे प्राध्यापक म्हणून ते बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये B.P. Sulakhe Commerce College विद्यार्थीप्रिय होते. मंगळवेढा mangalweda तालुक्यातील फटेवाडी Fatewadi या आपल्या मूळच्या गावी त्यांची फारशी स्थावर-संपत्ती नसल्यामुळे निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी गावाकडे न जाता बार्शीतच स्थायिक होणे पसंत केले.

विशालने ही आपल्यासारखे उच्च शिक्षण  घ्यावे, असा त्यांचा प्रयत्न होता. मात्र विशालला प्रारंभापासूनच अभ्यासात रस नव्हता.   त्याला छानछौकीची सवय लागली होती. इथे बार्शीत in Barshi वडिलांजवळ राहून ते शक्य नव्हते. त्यामुळे त्याने शिक्षणाच्या निमित्ताने बार्शी सोडली. परंतू शिक्षणाच्या बाबतीत तो फारशी कामगिरी करु शकला नाही. मात्र या दरम्यान आईच्या मध्यस्थीने वडिलांचा पैसा money मात्र त्याने भरपूर उधळला. बाहेर असतानाच त्याला ऐषआरामी राहणीमानाची सवय लागली होती.

बार्शीत परतल्यानंतर मात्र त्यासाठी त्याला स्वत: पैसे कमवावे लागणार होते. प्रारंभी त्याने वडिलांच्याच पैशावर नेट कॅफे सुरु केले. भावाच्या नावावर आधार सेवा केंद्र मिळविले. कॉमन सर्व्हिस सेंटरमधून comenn services center तो ऑनलाईनची कामे करु लागला. मात्र या दरम्यान इंटरनेटचं पेवच फुटल्याने अनेक प्रतिस्पर्धी तयार झाले. Vishal Fate scam: Fraud amount goes up to Rs 18.5 crore, police focus on Alka Fate

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या Shri Shivaji College परिसरात विद्यार्थ्यांचा जमावडा असल्याने या भागात अनेक नेट कॅफे उघडले गेले. त्यामुळे त्याची मिळकत कमी झाली. मग त्याने शेअर बाजाराकडे share bazar आपले लक्ष केंद्रित केले. तो वारंवार शेअर बाजाराबाबत बोलू लागला. त्यावेळी घरातून प्रारंभी त्याला वडिलांनी विरोध केला होता. शेअर बाजार आपला प्रांत नसल्याचे सांगितले होते. मात्र नेहमीप्रमाणे आई पाठीशी होतीच. आणि अल्पावधीतच त्याच्या हाती पैसा खेळू लागला. तो पैसा कसा येत होता, हे माहित नसले तरी तो जाणवण्याइतपत पैसा कमवू लागल्यामुळे वडिलही सुखावले. अखेर मुलगा रांगेला लागला अशी त्यांची भावना झाली. त्यामुळे प्रारंभी त्याला विरोध करणारे अलीकडे त्याचे कौतुक करत होते.

आपल्या परिचयातील अनेकांना ते आता त्याची शिफारसही करु लागले होते. गावाकडील भागातील एक माजी आमदार सांगोलेकर आबा Former MLA Sangolekar Aba त्यांच्याच ओळखीने विशालकडे काही आठवड्यापूर्वीच पैसे गुंतविण्यासाठी आले होते. त्यामुळे फटे कुटुंबियात आनंदी आनंद होता.

□ विशालका कंपनीमध्ये विश्वास संपादनासाठी उघडली कंपनी

बार्शी : गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी बिगबुल विशाल फटे याने 2019 मध्ये स्थापन केलेल्या विशालका कन्स्लटंट सर्व्हिसेस प्रा. लि. Vishalka Consultant Services Pvt. Ltd. या कंपनीमध्ये तो स्वत: आणि त्याचे वडिल अंबादास हे दोघेच संचालक आहेत. 10 लाख रुपये मूळ भांडवल असणारी ही कंपनी अजूनही कार्यरत आहे. या कंपनीच्या नावानेच त्याने अनेक बँकेत खाते उघडून पैसे गोळा केले आहेत.

या कंपनीची स्थापना त्याने 8 मे 2019 रोजी कंपनी व्यवहार खात्याकडे केली होती. विशाल प्रारंभी शेअर बाजारात स्वत:पुरते ट्रेडिंग treding  करत होता. त्यानंतर त्याने लोकांसाठी शेअर बाजाराची माहिती देण्यासाठी वर्ग सुरु केले. प्रारंभी तो मोफत वर्ग चालवायचा. सोशल मिडियावर त्याची जाहिरातबाजी केल्यानंतर पैसे गुंतवणूकीस उत्सुक असलेले परंतू शेअर बाजाराच्या कामकाजाची माहिती नसलेले अनेकजण त्याच्याकडे आकर्षित झाले. त्यामुळे नंतर त्याने मार्गदर्शन करण्यासाठी शुल्क आकारायला सुरुवात केली.

अलका शेअर सर्व्हिसेस या नावाने त्याने चार कोर्स सुरु केले. बेसिक कोर्स साठी तो 1 हजार, फंडामेंटल ऍनालिसेस कोर्स आणि  टेक्निकल ऍनालिसेस कोर्ससाठी  दीड हजार फी आकारायचा. हे कोर्स प्रति दिन 1 तासाप्रमाणे फक्त सहा दिवसात तो संपवायचा. ऍडव्हान्स कोर्ससाठी advance course 3 हजार रुपये फी आकारायचा. हा कोर्स 12 दिवसांचा होता. प्रत्येक बॅचमध्ये फक्त 10 जणांचा प्रवेश घ्यायचा. या कोर्ससाठी त्याच्याकडे झुंबड उडाली होती. त्यामुळे त्याचा संपर्क वाढू लागला.

याचवेळी शेअर बाजाराबाबत स्थानिक लोकांमध्ये असलेले अज्ञान त्याच्या लक्षात आले. हा कोर्स करणार्‍यांनाही त्याने फारसे काही शिकविले नाही. केवळ त्याची ओळख हाच या कोर्स साठी फी भरलेल्यांचा प्रत्यक्ष फायदा होता. तो बाजाराबाबत सफाईदारपणे बोलायचा, त्यामुळे त्याचा लोकांवर प्रभाव पडायचा. या कोर्समुळे झालेल्या जुजबी ज्ञानावर स्वतंत्रपणे शेअर बाजारात व्यवहार करण्याची हिंमत होत नसल्यामुळे पैसे गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेले मात्र स्वत: ट्रेडिंग करु न शकणारे त्याच्या नादी लागले.

या कोर्समध्ये त्याने दाखविलेल्या झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेनेही अनेकांना पछाडले. त्यामुळे त्याच्याकडील रांग वाढू लागली. मग त्याने पध्दतशीरपणे आपले जाळे विणायला सुरुवात केली. लोकं आपल्याकडे पैसे गुंतवायला उत्सुक आहेत, हे त्याच्या लक्षात आले. मात्र आपल्या वैयक्तिक खात्यावर लोक पैसे भरणार नाहीत, हे ही तो जाणून होता. त्याला लोकांकडून लाखो-कोटी मध्ये पैसे घ्यायचे होते. त्यामुळे  त्याने लोकांना भरवसा देण्याकरीता रितसर कंपनी उघडण्याचा मार्ग पत्करला.

या कंपनीत त्याने आपल्या कुटुंबाबाहेरील कोणालाही घेतले नाही. आपले वडील अंबादास गणपती फटे आणि आपण स्वत: दोघेच संचालक दाखवून त्याने विशालका कन्स्लटंन्ट सर्व्हिसेस प्रा. लि. ही खाजगी कंपनी उघडली. या कंपनीच्या नोंदणीपत्राआधारे त्याने अनेक बँकेत खाते  bank account उघडले आणि त्यावर आपल्याकडे येणारी गुंतवणूक स्वीकारायला सुरुवात केली.

You Might Also Like

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

उजनीतून ३७ लाख युनिट वीजनिर्मिती

TAGGED: #VishalFate #scam #Fraud #amount #crore #police #focus #AlkFate, #विशालफटे #स्कॅम #फसवणूक #रक्कम #साडेअठराकोटी #अलकाफटे #लक्ष #बार्शी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रसिद्ध कथ्थक नर्तक, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचे निधन
Next Article ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन; महाराष्ट्रावर शोककळा

Latest News

कपिल शर्माच्या हॉटेलवरील हल्ल्यात खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात
देश - विदेश July 11, 2025
अमेरिकेकडून लेखी हमी मिळेपर्यंत अणु चर्चा नाही -इराण
देश - विदेश July 11, 2025
गुजरात पूल दुर्घटना : मृतांचा आकडा १७ वर तर ३ जणांचा शोध अजूनही सुरू, ४ अधिकारी निलंबित
देश - विदेश July 11, 2025
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?