नवी दिल्ली / मुंबई : उत्तर प्रदेशात uttar pradesh समाजवादी पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचा अपमान केल्याचे भाजप नेते अतुल भातखळकर bjp leader Atul Bhatkhalkar यांनी म्हटले आहे. सपाने शरद पवार यांच्या राष्ट्रीय पक्षाला उत्तर प्रदेशात दिलेली एकमेव जागा परत घेतली आहे. हा अपमान सहन करता येण्यासारखा नाही. त्यांची उंची समजावून सांगण्यात राऊत पुन्हा कमी पडलेले दिसतात, असे खोचक ट्विट Stingy tweet भातखळकर यांनी केले आहे.
समाजवादी पार्टीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं Nationalist Congress with Samajwadi Party आपण युती करत असल्याबाबतची घोषणा केल्यानंतर समाजवादी पार्टीकडून राष्ट्रवादी-सपाचे बुलंदशहर जिल्ह्यातील अनुपशहर विधानसभेची जागा राष्ट्रवादीचं उमेदवार के. के. शर्मा लढवतील, असं जाहीर करण्यात आलं होतं.
मात्र त्यानंतर आता सोशल मीडियात social media ती जागा समाजवादी पक्षानं काढून घेतली असल्याची चर्चा सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सुरू होती. याला आता उत्तर प्रदेशचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी उत्तर दिलं आहे.
यादव बोलताना म्हणाले की, सध्या ज्या सोशल मीडियात चर्चा सुरू आहेत. त्या खोट्या आहेत. उलट आज आमची समाजवादी पक्षाचं प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत लखनौ येथे इतर जागांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. SP also took back one seat of NCP; BJP’s allegations are true or false
Happy New Year 2022 – नव्या नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या बैठकीला ज्या पक्षांनी समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे. त्या सर्वच पक्षांचे नेते याठिकाणी उपस्थित असतील. या बैठकीत प्रामुख्यानं इतर जागांबाबत अखिलेश यादव akhilesh yadav यांच्या सोबत चर्चा होणार आहे.
महाराष्ट्रातल्या पक्षांनी उत्तर प्रदेशात युतीचा निर्णय घेतल आहे. त्यासंदर्भात, खासदार प्रफुल्ल पटेल mp prafull patel यांनी उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांबाबत खुलासा केला होता. “अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करणार आहेत” आम्ही सर्व नेते उत्तर प्रदेशात जाणार आहोत, असं पटेल यांनी स्पष्ट केलं होतं. विशेष म्हणजे शरद पवार यांनीही निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशात जाणार असल्याचं यापूर्वीच सांगितलं आहे.
काल सोमवारी सोशल मीडियात राष्ट्रवादीकडून समाजवादी पक्षानं जागा काढून घेतल्याबाबत चर्चा रंगल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि आमदार राम सातपुते mla ram saatpute यांनी राष्ट्रवादीला ट्विटरच्या माध्यमातून लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत आपल्या ट्वीटच्या माध्यमातून आमदार अतुल भातखळकर म्हणतात की, समाजवादी पक्षानं शरद पवार यांच्या राष्ट्रीय पक्षाला उत्तर प्रदेशात दिलेली एकमेव जागा परत घेतली आहे. हा अपमान सहन करता येण्यासारखा नाही. त्यांची उंची समजावून सांगण्यात संजय राऊत पुन्हा कमी पडलेले दिसतात. तर आमदार राम सातपुते यांनी याला अपमान नाही, तर लायकी दाखवली म्हणतात. आशा शब्दांत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.
दरमान्य, याबाबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक ncp leader nawab malik म्हणाले की, “भाजपकडून ज्याप्रकारे दावा केला जातो आहे की, राष्ट्रवादीला देण्यात आलेली जागा काढून घेण्यात आली आहे. तो दावा पूर्णतः खोटा आहे. असा कुठलाही प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडलेला नाही. आम्हाला अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षानं बुलंदशहर जिल्ह्यातील अनुपशहर विधानसभेची जागा दिली आहे. या ठिकाणी आमचे उमेदवार के के शर्मा candidates k k sharma हे असणार आहेत. याबाबत अधिकृत घोषणा समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आली आहे.