Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दोन लहान मुलीवर अत्याचार; समजले रूग्णालयात गेल्यावर, तक्रार देण्यास नकार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

दोन लहान मुलीवर अत्याचार; समजले रूग्णालयात गेल्यावर, तक्रार देण्यास नकार

Surajya Digital
Last updated: 2022/01/21 at 10:15 AM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

सोलापूर – खाजगी रुग्णालयात private hospital उपचारासाठी नातेवाईकांनी दाखल केलेल्या दोन लहान मुलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र पीडित मुलींच्या पालकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी medical checkup करण्यास किंवा तक्रार देण्यास विरोध केला. त्यामुळे सरकारतर्फे फौजदार चावडीच्या पोलिसांनी अनोळखी  इसमाविरुध विरुद्ध बलात्कार आणि पॉक्सोचा गुन्हा Rape and pox crime दाखल करून तो गुन्हा  मंद्रूप पोलिसाकडे mandrup police तपास करण्यासाठी नुकताच वर्ग केला. ही संतापजनक घटना दक्षिण सोलापूर तालुका South Solapur Taluka परिसरात घडली.

दक्षिण सोलापूर तालुका परिसरातील (३ वर्ष ६ महिने) आणि (६ वर्षे)  अशा दोन मुलींना तिच्या नातेवाईकांनी शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल केले होते. त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा संशय आल्यामुळे डॉक्टरांनी आणि याची माहिती संबंधित फौजदार चावडी पोलिसांना कळविली.

पोलिसांनी त्या रुग्णालयात जाऊन चौकशी केली. आणि त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे समजल्यानंतर याची माहिती मंद्रूप पोलिसांना कळविली. त्या पोलिसांनी पीडित मुलींच्या पालकांचा शोध घेतला आणि याची माहिती बाल कल्याण समितीला Information Child Welfare Committee कळविली. समितीच्या आदेशाप्रमाणे पीडित मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी पिडीत मुलींच्या पालकांनी  वैद्यकीय तपासणी Medical examination करण्यास नकार दिला.

हा प्रकार फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाजगी रुग्णालयात  उघडकीस आल्यामुळे एका अधिका-याने सरकारतर्फे फिर्याद दाखल केली.आणि अनोळखी इसमाविरुद्ध  बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा नोंदविला. ती फिर्याद पुढील तपास कामासाठी मंद्रूप पोलिसाकडे  वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. Atrocities on two little girls; Understood to go to the hospital, refuse to report

□ बणजगोळ येथे दोन गटात कुऱ्हाडीने मारहाण, चौघे जखमी

सोलापूर – शेतात बसलेल्या विद्युत डीपीचे Electrical DP खर्चाच्या वादातून व्हसुरे आणि खांडेकर यांच्या गटात कुऱ्हाड काठी यांनी झालेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले. ही घटना बणजगोळ  (ता.अक्कलकोट) येथे बुधवारी (ता. १९) रात्रीच्या सुमारास घडली. सर्व जखमींना अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात government hospital दाखल करण्यात आले.

रेवप्पा अमृत व्हसुरे (वय ३५ रा. बनजगोळ) असे पहिल्या गटातील जखमीचे नाव आहे. त्याच्या शेतात विद्युत डीपी बसविले होते. त्याच्या खर्चाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून त्याला शेताजवळ बोलावून प्रकाश गुरण्णा खांडेकर आणि ६ जणांनी मिळून कु-हाड आणि काठीने मारहाण केली. असे त्याच्या जबाबात नमूद आहे.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

तर दुसर्‍या गटातील प्रकाश गुरण्णा खांडेकर (वय ५२), शिवकुमार राजेंद्र खांडेकर (वय २६) आणि राजेंद्र प्रकाश खांडेकर (वय ११ सर्व रा.बनजगोळ) असे तिघे जखमी झाले. विद्युत मोटार चालू करण्याच्या कारणावरून गुंडप्पा व्हसुरे आणि अन्य ५ जणांनी त्यांना कुऱ्हाड आणि काठीने मारहाण केली असे त्यांच्या जबाबात नमूद आहे. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

□ पत्नी माहेरी गेल्याने फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

कुमठा नाका Kumtha Naka परिसरातील तक्षशिलनगर येथे राहणाऱ्या शिवशरण सूर्यकांत सुरेकर (वय ३४) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आज गुरुवारी दुपारच्या सुमारास त्याने घरातील छताच्या वाशाला ओढणीने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडवून निरंजन (भाऊ) यांनी  बेशुध्दावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. याची पत्नी माहेरी गेली. ती नांदण्यास येत नसल्याच्या कारणावरून त्याने हा प्रकार केला. अशी प्राथमिक  नोंद सदर बझार पोलिसात झाली आहे .

□ वृद्ध महिलेच्या खून प्रकरणी अज्ञात इसमावर गुन्हा

सोलापूर : वृद्ध महिलेला चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी एका अज्ञात इस्माविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.इंदुबाई नारायण खमितकर (वय ७०) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी अमृत नारायण खमितकर (वय-५०,रा.विनायक नगर,सोलापूर) यांच्या घरात कोणी नसताना एका अनोळखी इसमाने फिर्यादी यांची आई इंदुबाई खमितकर यांना अज्ञात कारणावरून गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केला. ही घटना बुधवारी (१९ जानेवारी) दुपारी बारा ते अडीच वाजण्याच्या दरम्यान घडली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #Atrocities #two #littlegirls #Understood #hospital #refuse #report, #दोन #लहान #मुलीवर #अत्याचार #रूग्णालय #तक्रार #नकार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राष्ट्रवादीचे अमोल कोल्हेंचे नथुराम गोडसेंच्या भूमिकेवरुन स्पष्टीकरण
Next Article मोहोळमध्ये लिप्ट मागत लुटणाऱ्या ८ महिलांना सुनावली पोलिस कोठडी

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?