नांदेड : एका सामान्य शिवसैनिकांने स्वखर्चातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर उभारले आहे. नांदेडच्या nanded मुखेड mukhed तालुक्यातील इटग्याळ गावात हे मंदिर बांधण्यात आले. संजय इटग्याळकर Sanjay Itagyalkar असे या अल्पभूधारक कुटुंबातील शिवसैनिकाचे नाव आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर बाळासाहेबांचे विचार त्यांचा हिंदुत्वाविषयीची जागरूकता, लढा हा तरुण पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी त्याने जमीन land विकून बाळासाहेबांचे मंदिर उभारले.
स्वर्गीय बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांची आठवण जिवंत ठेवण्यासाठी आपण हे मंदिर बनवल्याचे संजयने सांगितलंय. बाळासाहेबांच्या प्रेमापोटी स्वखर्चातून एका सामान्य शिवसैनिकाने उभारलेल्या या मंदिराविषयी नांदेड जिल्ह्यात मात्र सर्वत्र चर्चा आहे.
मुखेड तालुक्यातील इटग्याळ या छोट्याशा गावात वास्तव्यास असणाऱ्या व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या संजय इटग्याळकर या तरुणास बालपणापासूनच बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व, मराठी माणूस व हिंदुत्व यासाठीचा त्यांचा लढा या विषयी नेहमीच आकर्षण राहिले आणि तो शिवसेनेकडे ओढला गेला. बी.ए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर उदरनिर्वाहासाठी व शिवसेना बाळासाहेबांना जवळून पाहता यावे त्यांच्या सान्निध्यात राहता यावे यासाठी त्याने 2000 मध्ये थेट मुंबई गाठली होती.
त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी मुंबई येथील अंधेरी स्थित जानकी देवी पब्लिक स्कूल येथे मुलांना कराटे प्रशिक्षण देण्याचे काम स्वीकारले. एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेत काम सुरू केले.
Balasaheb Thackeray’s temple
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दरम्यान घरच्या परिस्थितीमुळे व कुटुंबाच्या जिम्मेदारीमुळे 2007 साली संजयने पुन्हा आपले गाव इटग्याळ गाठले. परंतु या दरम्यान त्याने बाळासाहेब व शिवसेनेचे काम मात्र चालू ठेवले. एवढेच नाही तर दरवर्षी न चुकता ते आतापर्यंत दसरा मेळाव्यास आपली हजेरी लावतात.
या दरम्यान बाळासाहेबांच्या निधनानंतर बाळासाहेबांचे विचार त्यांचा सामन्या विषयीचा लढा, त्यांची हिंदुत्वाविषयीची जागरूकता ही तरुण पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी 2013 साली त्याने आपल्या वडिलोपार्जित जागेत बाळासाहेबांचा पुतळा उभारला. ज्या ठिकाणी 2013 पासून आतापर्यंत एक ज्योत नेहमी तेवत असते. परंतु बाळासाहेबांचा हा पुतळा उभारल्यानंतर ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक आपदांमुळे पुतळ्याचे नुकसान होऊ नये यासाठी त्याच जागेवर बाळासाहेबांचे मंदिर उभारण्याचे ठरवले.
संजय उदरनिर्वाहासाठी देगलूर, मुखेड, उदगीर याठिकाणच्या तरुणांना कराटे प्रशिक्षण देतात. पण कोरोना व लॉकडाऊनमुळे तेही बंद झाले आणि आर्थिक आवक बंद पडली. त्यासाठी त्यांनी वडिलोपार्जित 2 एकर जमीन विक्री करून व तब्बल 14 लाख रुपये खर्च करून बाळासाहेबांचे सुंदर व सुबक असे मंदिर उभारलंय. जवळपास एक एकर परिसरात विस्तीर्ण अशा जागेत संजय इटग्याळकर यांनी हे मंदिर उभारले आहे.
याठिकाणी मोफत कराटे प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा आणि सांस्कृतिक सभागृह उभारून या परिसरातील तरुणांना त्याचा लाभ मिळावा हा त्यांचा मानस आहे.
संजय इटग्याळकर यांनी उभारलेल्या या बाळासाहेबांच्या पुतळ्यास 2019 साली नांदेड दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनीही भेट दिलीय. या तरुणाने त्याच्या वाट्याला आलेली वडिलोपार्जित जमीन विकून हे मंदिर बनवलंय. स्वर्गीय ठाकरे यांच्या मंदिरासोबतच हा परिसर निसर्गरम्य करण्यासाठी या शिवसैनिकांनी मोठी मेहनत घेतलीय.