सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या येथील बंगल्यात bangalo जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पदाधिकारी यांच्यात सोमवारी Monday (ता. 24 ) रात्री जोरदार राडा झाला. दरम्यान संबंधित सदस्यांनी अध्यक्षांच्या पतीला आणि दिराला मारहाण beaten केली असल्याचा आरोपही स्वतः अध्यक्षा प्राजक्ता कोरे (Chairman Prajkta kore) यांनी केला आहे.
एका पाण्याच्या निविदेच्या वादातून ही हाणामारी झाली असल्याचे म्हटले जात आहे. यात विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल झाली आहे. विशेष म्हणजे सांगली जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असून अध्यक्षा भाजपच्याच आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे या सोमवारी रात्री बंगल्यावर होत्या. त्यावेळी बाहेरून काही सदस्य आल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. वादातून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार आणि मोडतोड हा सर्व प्रकार पाहून अध्यक्ष कोरे या तेथून तात्काळ निघून गेल्याच्या वृत्त आहे.
जि.प. अध्यक्ष यांचे दीर राजू कोरे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत त्यांनी म्हटले आहे की, अध्यक्षांच्या बंगल्यावर रात्रीच्यावेळी जिल्हा परिषद अपक्ष सदस्य संभाजी कचरे, सदस्य अरुण बालटे, विद्यमान समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे, महिला बाल कल्याण सभापती सुनीता पवार आणि शिक्षण सभापती आशा पाटील यांचे पती यांनी अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या शासकीय निवासस्थानात घुसून निवासस्थानाची तोडफोड केली. Sangli Z.P. Radha at the President’s bungalow; Deera along with the president’s husband was beaten
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यात कुंड्या, खुर्च्या यांची तोडफोड करीत एकमेकांच्या अंगावर जात हमरीतुमरी झाली. त्यात काही जणांना धक्काबुक्की आणि मारहाणही झाली. गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली. याबाबत विश्रामबाग पोलिस vishrambag police ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोन्ही गटांतील सदस्य विश्रामबाग पोलिस ठाण्यात थांबून होते. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता.
याबाबत घटनास्थळी आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जिल्हा परिषदेतील निधी वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून सदस्य, पदाधिकारी यांच्यामध्ये वाद सुरू आहे. सोमवारी रात्री जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष, त्यांचे पती, दीर आणि काही सदस्य थांबलेले होते.
यावेळी भाजपचे काही पदाधिकारी, अपक्ष सदस्य अध्यक्षांच्या बंगल्यावर आले. त्यांच्यात निधी वाटपावरून पुन्हा जोरदार वादावादी झाली. वादावादीत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. शिवीगाळही झाली. या वादावादीतून काहींनी बंगल्यात असलेल्या कुंड्यांची तोडफोड केली.
खुर्च्याही मोडल्या. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे दीर राजू कोरे हे तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्याशिवाय विरोधी गटातील सदस्य पदाधिकारी यांनीसुद्धा विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेतली. परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. त्यानुसार पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल झाली आहे.