नवी दिल्ली : मोदी सरकारने यंदा पद्मविभूषण पुरस्कारासाठी 4 जणांच्या नावाची घोषणा केली. माजी सीडीएस जनरल बिपीन रावत (नागरी सेवा), माजी भाजप नेते कल्याण सिंग (सार्वजनिक व्यवहार) आणि गीताप्रेस गोरखपूरचे अध्यक्ष राधेश्याम खेमका (साहित्य आणि शिक्षण) या तिघांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात येणार आहे. याशिवाय भारतीय शास्त्रीय संगीतकार डॉ प्रभा अत्रे यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे.
□ भारताचे नाव जगासमोर आणणारे सुंदर पिचाई यांना पद्मभूषण !
यंदा मोदी सरकारने पद्मभूषण पुरस्कारासाठी 17 जणांच्या नावांची घोषणा केली आहे. राजकीय नेत्यांमध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा यात समावेश आहे. याशिवाय भारताचे नाव जगासमोर आणणारे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनाही पद्मविभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे. This year 4 persons were honored with Padma Vibhushan award; This year Padma Bhushan was awarded to 17 veterans with beautiful Pichai
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कोरोना साथीतून देशाला बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लस उत्पादकांना पद्मभूषण सन्मान देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. भारत बायोटेकचे संस्थापक, देशातील पहिली स्वदेशी लस कोवॅक्सिनचे निर्माते कृष्णा एला आणि त्यांच्या पत्नी सुचित्रा एला यांची तसेच कोविशील्ड लसीद्वारे देशाचे कोरोनापासून संरक्षण करण्याची जबाबदारी असलेले सिरमचे सायरस पूनावाला यांनाही पद्मभूषणने सन्मान होणार आहे. This year 4 persons were honored with Padma Vibhushan award; This year Padma Bhushan was awarded to 17 veterans with beautiful Pichai
□ पद्मश्रीमध्ये महाराष्ट्रातील सात जणांचा सन्मान होणार आह
– डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर)
– हिंमतराव बाविस्कर
– सुलोचना चव्हाण
– डॉ. विजयकुमार डोंगरे
– सोनू निगम
– अनिलकुमार राजवंशी
– भीमसेन सिंघल
□ यंदा 17 दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार
– गुलाम नबी आजाद: पब्लिक अफेयर्स
– विक्टर बनर्जी: आर्ट
– गुरमीत बावा (मरणोपरांत): आर्ट
– बुद्धदेव भट्टाचार्य: पब्लिक अफेयर्स नटराजन चंद्रशेखरन: ट्रेड एंड इंडस्ट्री
– कृष्णा एल्ला और सुचित्रा एल्ला: ट्रेड एंड इंडस्ट्री
– मधुर जाफरी: पाक कला
– देवेंद्र झाझरिया: खेल
– सुंदर पिचाई
– सायरस पुनावाला
– संजया राजाराम (मरणोत्तर)
– प्रतिभा रे
– स्वामी सच्चिदानंद
– वशिष्ठ त्रिपाठी
2022 सालातील पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातून प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, संरक्षण क्षेत्रामधून बिपिन रावत, कल्याण सिंग यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यांच्यासोबतच सोनू निगम, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.