Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माजी मुख्यमंत्र्यांनी पद्मभूषण तर बंगाली गायिकांनी पद्मश्री नाकारला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

माजी मुख्यमंत्र्यांनी पद्मभूषण तर बंगाली गायिकांनी पद्मश्री नाकारला

Surajya Digital
Last updated: 2022/01/26 at 1:40 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री  ex cm बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. पत्रक काढत भट्टाचार्य यांनी याबाबत माहिती दिली. तर काही वेळात बंगाली गायिका मुखर्जी यांनीही आपणास अपमान वाटत असल्याचे म्हणत पुरस्कार नाकारला.

माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य म्हणाले, मला पद्मभूषण पुरस्काराबाबत काहीही माहिती नाही. मला याबाबत कुणी विचारले नाही. जर कुणी मला हा पुरस्कार दिला असेल तर मी तो पुरस्कार नाकारत आहे. बुद्धदेव भट्टाचार्य हे २००० ते २०११ पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते.

यावर्षी देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार ४ जणांना जाहीर declared झाला आहे. तर पद्मभूषण पुरस्कार १७ जणांना जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय पद्मश्री हा पुरस्कार १०७ जणांना जाहीर झाला आहे. पण आता या पुरस्कारांवरून वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattacharjee) यांनाही केंद्र सरकारने (Central Government) पद्म भूषण पुरस्कार जाहीर केला. पण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी अवघ्या दोन तासात पुरस्कार नाकारला आहे. पुरस्काराबाबत आपल्याला कळवलेच नसल्याचे कारण देत त्यांनी हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. त्यावरून आता उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. Former Chief Minister Padma Bhushan and Bengali singers denied Padma Shri

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

त्यातच आता ९० वर्षांच्या प्रसिध्द बंगाली गायिकेने पुरस्कार नाकारल्याचे समोर आले आहे. बंगालमधील प्रसिध्द गायिका संध्या मुखर्जी (Sandhya Mukherjee) यांनाही पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार होता. पण त्यांनी हा पुरस्कार नाकारला. पद्म पुरस्कार नाकारणारे दोघेही बंगालमधील आहेत. मुखर्जी यांच्या कन्या सौमी सेनगुप्ता Soumi Sengupta यांनी याबाबत माध्यमांना माहिती information दिली. आईनेच हा पुरस्कार स्वत:हून नाकारल्याचे त्यांनी सांगितले.

‘नव्वदाव्या वर्षी तिच्यासारख्या महान गायिकेला पदश्री पुरस्कार देणं, अपमानजनक आहे. पुरस्कार नाकारण्यामागे कोणतीही राजकीय भूमिका  role नाही. राजकारणापासून आई कोसो दूर आहे. त्यामुळे यामागे कोणतेही राजकीय कारण politics reson शोधू नये. तिला अपमानजनक वाटल्याने पुरस्कार नाकारला,’ असेही सेनगुप्ता यांनी स्पष्ट केला. मुखर्जी यांनी हजारो बंगाल गाणी गायली असून इतर डझनभर भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांना 2011 मध्ये बंगालमधील सर्वोच्च बंग भूषण पुरस्कार Banga Bhushan Award देण्यात आला आहे. 1970 मध्ये त्यांना सर्वोच्च चित्रपट गायिका म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.

संध्या मुखर्जी यांनी अनिल विश्वास, मदन मोहन, एस़डी़ बर्मन, रोशन आणि सलील अशा अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. त्यांना ‘बंग विभूषण’सह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Former #ChiefMinister #PadmaBhushan #Bengali #singers #denied #PadmaShri, #माजीमुख्यमंत्री #पद्मभूषण #बंगाली #गायिक #पद्मश्री #नाकारला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर अक्कलकोट महामार्गावर दोन ट्रक, कारमध्ये विचित्र अपघात; सहा जण गंभीर जखमी
Next Article दगडफेक, जाळपोळ अन् गोळीबार ! रेल्वेने परीक्षा केली रद्द

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?