Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: स्वर्णा पॅलेज हॉटेलच्या कोविड सेंटरला भीषण आग; सातजणांचा मृत्यू तर ३० जणांना वाचवण्यात यश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

स्वर्णा पॅलेज हॉटेलच्या कोविड सेंटरला भीषण आग; सातजणांचा मृत्यू तर ३० जणांना वाचवण्यात यश

Surajya Digital
Last updated: 2020/08/09 at 9:48 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अमरावथी : आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे कोविड सेंटर असलेल्या एका हॉटेलला भीषण आग लागली असून यात सात रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.

आज रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. विजयवाडा येथील स्वर्णा पॅलेज हॉटेलचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आले होते. तेथे कोरोना व्हायरस बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. आग लागली त्यावेळी स्वर्ण पॅलेस हॉटेल या रुपांतरीत कोविड केअर सेंटरमध्ये ३० रुग्ण आणि १० वैद्यकीय कर्मचारी होते. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पण हॉटेलमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्याने इथल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दरम्यान, १७ रुग्णांना लॅडरच्या माध्यमातून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर इथल्या सुरक्षा रक्षकासह दोन कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरुन उड्या टाकल्या आहेत. एनडीआरएफच्या कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेबाबत ऐकून धक्का बसल्याचे म्हटले आहे. तसेच यात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांप्रती दुःख व्यक्त करीत आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना बचाव कार्य राबवण्याबरोबरच जखमींना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

“आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली. प्राथमिक चौकशीतून शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचे कळते. मात्र, याचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या आग लागलेले हॉटेल पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. सुमारे २२ रुग्ण या ठिकाणी उपचार घेत होते.”

मोहम्मद इम्तियाज – जिल्हाधिकारी , जि. कृष्णा

You Might Also Like

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज

नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार

दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक

भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी

इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपल्याचा ट्रम्प यांचा दावा

TAGGED: #विजयवाडा #आग #कोविडसेंटर #सातमृत्यू #30जणसुखरुप #कृष्णाजिल्हा #आंध्रप्रदेश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आठ शौर्य पदकप्राप्त मराठी पायलटचा केरळ दुर्घटनेत मृत्यू; दोन्ही पुत्र देशासाठी गमावले, गृहमंत्र्यांनी केले सांत्वन
Next Article बिहार सरकारला चौकशीचा अधिकारच नाही; महाराष्ट्र सरकारची न्यायालयात माहिती

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?