मुंबई : कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्रातील maharashtra काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी pm Narendra Modi यांनी केला होता. त्यामुळे काँग्रेस आज राज्यभरातील भाजपच्या कार्यालयांसमोर आंदोलन करत आहे. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली पाहिजे, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे. मुंबईत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Relief and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान मोदींनी संसदेत बोलताना काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मोदींविरोधात आंदोलन पुकारलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याची घोषणा केली. उद्या बुधवारी भाजपच्या सर्व कार्यालयासमोर आम्ही ‘महाराष्ट्राची माफी मागावी’ असे फलक घेऊन उभे राहणार असल्याचं ते म्हणाले. तसेच मोदींनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी, असंही ते म्हणाले.
Statewide agitation of Congress against Prime Minister Narendra Modi
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मोदीजी माफी मांगो अशा घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना पसरवण्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. मोदी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार. प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत असून माफी मागितल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असे नाना पटोले म्हणाले.
महाराष्ट्रातील भाजपच्या लोकांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस Chandrakant Patil, Devendra Fadnavis यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. उद्यापासून महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते पंतप्रधानांनी माफी मागावी, अशी मागणी केलीय. निषेधाची फलक घेऊन उभे राहिले. महाराष्ट्राच्या अपमानाचा निषेध करण्याची भूमिका role घेणार असून हे आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा नाना पटोले यांनी म्हटलंय.
राज्यात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून अमरावतीत amravati आज काँग्रेस congress कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली.