पुणे : आरोग्य भरती पेपर फुटी Health recruitment paper burst प्रकरणातील मुख्य म्होरक्या अतुल प्रभाकर राख याला अटक करण्यात आली आहे. आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परिक्षांचे पेपर फुटले होते. या प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याच्या सर्व ॲक्टीव्हीटी अतुल राख करत होता. अतुल राख याला पोलिसांनी पुण्यातूनच जेरबंद केलं आहे.
या प्रकरणात पोलिसांनी अनेक जणांना अटक केलीय. आता आणखी एका म्होरक्याला पुणे सायबर पोलिसांनी (Pune cyber police )अटक केले आहे. अतुल प्रभाकर राख (Atul Prabhakar rakh) (रा.थेरला ह.मु. अंकुशनगर कपिल मुनी मंदिराच्या पाठीमागे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अतुल हा टकेतील आरोपी संजय सानपाचा मेहुणा आहे. Health recruitment scam – Chief arrested from Pune
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परिक्षांचे पेपर फुटले होते. या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलीसांना वडझरीचे सानप बंधू हवेत आतापर्यंत पोलिसांनी केवळ संजय शाहुराव सानप यांना जेरबंद केलं आहे. अतुल याची अटक झाल्याने इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत.
पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याच्या सर्व अॅक्टीव्हीटी अतुल राख करायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याकडून या प्रकरणातील अनेक गोष्टींचा उलगडा होईल, अशी आशा पोलिसांना आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांना यांची मदत होणार आहे.
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख आणि आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर याच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे. म्हाडा, आरोग्य आणि टीईटी प्रकरणातील आरोपींच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे. पेपरफुटीप्रकरणी लाचलुचपतची कलमं लावण्यात येणार आहेत.