मुंबई : एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी MIM chief and MP Asaduddin Owaisi यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारतात हिजाबवरून वाद सुरू आहे. त्यावर पाकिस्तानमधूनही प्रतिक्रिया येत आहेत. मात्र ‘आमच्याकडे पाहू नका, तुमच्या पाकिस्तानातच अनेक भांडणं आहे, त्याकडे लक्ष द्या, हा देश माझा आहे, तुमचा नाही, हे आमच्या घरातील प्रकरण (हिजाब वाद) आहे, तुम्ही यात पडू नका, जखमी व्हाल,’ अशा शब्दात ओवेसींनी पाकिस्तानला सुनावले आहे.
उडुपी येथील महाविद्यालयात सहा मुलींना महाविद्यालयीन गणवेश परिधान न करता हिजाब (Hijab Controversy) परिधान केल्यामुळे वर्गात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. यानंतर मुली धरणावर बसल्या. कॉलेजने काहीही न ऐकल्याने त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. या प्रकरणावर काल उच्च न्यायालयात सुनावणी झाली. व्यक्तीच्या वैयक्तिक विश्वासापेक्षा संविधान आणि कायदा महत्त्वाचा आहे, असे न्यायालयाने म्हटले होते. Dispute over hijab, MIM chief Owaisi warns Pakistan
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कर्नाटकच्या उडुपीमध्ये मुस्लीम मुलींनी बुरखा किंवा हिजाब घालून येण्यावरून वाद सुरू आहे. या वादादरम्यान देशभरातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत असताना सीमेपलीकडून पाकिस्ताननेही भारतावर यावरून टीका केली होती. त्याला MIM पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी भाजपच्या लोकांना भडकावण्याचे काम करीत असल्याचे म्हटले आहे. संसदेत टोपी घालता येत असेल तर शाळा कॉलेजमध्ये हिजाब घालायला काय हरकत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मी माझ्या संविधानाबद्दल बोलत आहे. मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल बोलत आहे. जर आपण टोपी घालून संसदेत जाऊ शकतो तर मुलगी हिजाब घालून कॉलेजला का जाऊ शकत नाही. २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये भाजपने याच बळावर विजय मिळवला आहे. मूलतत्त्ववाद येतो कुठून? तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनीही कान व डोळे बंद केले आहेत, असेही ओवेसी (Asaduddin Owaisi) म्हणाले.
“मलालावर हल्ला पाकिस्तानमध्येच झाला होता. पाकिस्तानच्या संविधानानुसार कुणी गैरमुस्लीम व्यक्ती तिथला पंतप्रधान होऊ शकत नाही. आम्ही पाकिस्तानच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही इकडे बघू नका. तिकडेच बघा”
– असदुद्दीन ओवेसी, खासदार