Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रस्ते अपघातातील जीवितहानी कमी करण्यासाठी नितीन गडकरींची मोठी घोषणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

रस्ते अपघातातील जीवितहानी कमी करण्यासाठी नितीन गडकरींची मोठी घोषणा

Surajya Digital
Last updated: 2022/02/11 at 2:17 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी रस्ते अपघातातील  जीवितहानी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कारमध्ये मागील सीटवर मध्ये बसणाऱ्या व्यक्तीसाठी थ्री पॉईंट सीट बेल्टची Three point seat belt व्यवस्था नसते. मात्र यापुढे कार निर्मिती कंपन्यांना मध्यभागी बसणाऱ्या प्रवाशासाठी थ्री पॉईंट सीट बेल्ट उपलब्ध करून द्यावा लागेल, असं गडकरी म्हणाले. तसेच यासंदर्भातील फाईलवर मी सही केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मोटार सुरक्षा वातावरण यावरील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की वर्ष 2025 पर्यंत रस्ते अपघातांचे प्रमाण निम्म्यावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सुरक्षेची तरतूद वाढवण्याच्या दृष्टीने चार अतिरिक्त एअर बॅग आणि थ्री पॉईंट सीट बेल्ट आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Nitin Gadkari’s big announcement to reduce casualties in road accidents

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

वाहनांची सुरक्षा अधिक सुधारण्यासाठी वाहनांची मानके आणि व्यवस्था यांच्यावर आधारित तारांकित गुणानुक्रम म्हणजेच स्टार रेटिंग देण्याची पद्धत प्रस्तावित आहे,असे त्यांनी सांगितले. त्यामुळे खरेदीदाराला त्या माहितीवर आधारित निर्णय घेता येईल, असे त्यांनी नमूद केले.

कारमध्ये बसणाऱ्या सर्व प्रवाशांना थ्री पॉईंट सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आले आहे. कारमध्ये मागील सीटवर मध्ये बसणाऱ्या व्यक्तींसाठी थ्री पॉईंट सीट बेल्टची व्यवस्था नसते. यापुढे कार निर्मिती कंपन्यांना मध्यभागी बसणाऱ्या प्रवाशासाठीही थ्री पॉईंट सीट बेल्ट उपलब्ध करून द्यावा लागणार असल्याचं, गडकरींनी स्पष्ट केलं आहे. दरवर्षी देशात जवळपास 5 लाख रस्ते दुर्घटना होतात. त्यात दीड लाख लोक मृत्यूमुखी पडतात. संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

गडकरी यांनी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, सुधारित इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टिम, धोकादायक मालाची वाहतूक, दिव्यांगांसाठी सुलभता, चालकाला झोप येत असल्यास लक्ष वेधणारी इशारा व्यवस्था, ब्लाइंड स्पॉट माहिती व्यवस्था, सुधारित चालक मदतनीस, लेन डिपार्चर इशारा व्यवस्था, आदींचा उल्लेख केला. आवाजाचे प्रदूषण कमी करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर याच्या महत्वावर मंत्रीमहोदयांनी यावेळी भर दिला. रस्ते सुरक्षा उपाय योजनांबद्दल सामूहिक जनजागृती ही काळाची गरज असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. यासाठी माध्यमे आणि लोकसहभागातून माहितीचा प्रसार होणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

 

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #NitinGadkari's #big #announcement #reduce #casualties #road #accidents, #रस्ते #अपघात #जीवितहानी #नितीनगडकरी #मोठी #घोषणा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोहोळ परिसरात विष प्राशन केल्याने दोघांचा मृत्यू, पंढरपुरातील अपघातात एक ठार
Next Article ठाकरे सरकारचे मंत्री बच्चू कडू यांना 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?