बंगळूरू : कर्नाटकमध्ये हिजाबचा वाद चांगलाच चिघळला आहे. त्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागानं सर्व पदवी महाविद्यालये, विद्यापीठे आणि व्यावसायिक अभ्यासक्रम संस्था 16 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याआधी कर्नाटक सरकारने सर्व महाविद्यालयं, शाळा आणि शैक्षणिक संस्था 11 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कर्नाटक सरकारने सर्व महाविद्यालयं, शाळा आणि शैक्षणिक संस्था 11 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवल्या होत्या. मात्र शुक्रवारी मुख्यमंत्री बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. ज्यामध्ये सोमवारपासूनही शाळा, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्था उघडणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आलं. वाढता वाद पाहता कर्नाटक सरकारने सर्व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयं तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जो आता 16 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे.
Hijab controversy erupts! Colleges, universities closed till 16th February
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
शाळा, महाविद्यालयं किंवा शैक्षणिक संस्था उघडल्या तर तिथे काही अप्रिय घटना घडू शकतात अशी शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील संवेदनशील भागांमध्ये पोलीस प्रशासन, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांनी स्वतः दौरा करावा आणि तिथली परिस्थिती काय आहे याचा अंदाज घ्यावा असंही सूचित करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी शाळा, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्था यांच्या कर्मचाऱ्यांसोबत म्हणजेच त्यांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक यांच्यासोबत संपर्कात राहिलं पाहिजे तसंच काय परिस्थिती आहे याचा अंदाज लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते यांनाही दिला पाहिजे असंही सरकारने म्हटलं आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की ‘कुठल्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था यांचं पालन केलं गेलंच पाहिजे. हायकोर्टाचे आदेश आहेत त्यांचं पालन केलं गेलंच पाहिजे. तसंच शांतता कशी प्रस्थापित होईल आणि कोणत्याही अप्रिय घटना कशा घडणार नाहीत यावर लक्ष केंद्रीत केलं गेलं पाहिजे.’
जानेवारी महिन्यात उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयात 6 विद्यार्थिनी महाविद्यालय प्रशासनाच्या नियमांविरुद्ध हिजाब घालून महाविद्यालयात आल्या होत्या. यानंतर कर्नाटकातील इतर महाविद्यालयांमध्येही हिजाब घालण्यावरून वाद निर्माण झाला होता. हिजाबच्या निषेधार्थ काही विद्यार्थी भगवी शाल घेऊन शाळा-कॉलेजमध्ये येऊ लागले. त्यामुळे प्रकरण अधिकच तापले. मंगळवारी हिजाबच्या वादावरून कर्नाटकातील शिवमोग्गा आणि बागलकोट जिल्ह्यात दगडफेक झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या जिल्ह्यांमध्ये हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनी आणि त्यांचे समर्थक आणि भगवी शाल परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या गटामध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, अभिनेत्री कंगनानेही उडी घेतली. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत हे लिहिलंय. मुक्त होऊन जगायला शिका, स्वतःला पिंजऱ्यात ठेवू नका. हिम्मत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानमध्ये हिजाब न घालता वावरून दाखवा, असं कंगना म्हणाली. तुम्हाला हिम्मत दाखवायची असेल तर हिजाब न घालता अफगाणिस्तानमध्ये वावरून दाखवा, असं आव्हान कंगनानं हिजाब समर्थनार्थ लढणाऱ्या लोकांना दिलं आहे.