सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या जनतेची गेल्या 30 वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. शासकीय मेडिकल कॉलेजला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मंजुरी दिली आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमात 100 सीट प्रवेश देण्यास मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली.
शासकीय मेडिकल कॉलेजला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने National Medical Council मंजुरी दिली आहे. यावर्षी 100 सीट एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश देण्यास मान्यता मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली.अनेक अडथळे पार करत आणि अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्गवासीयांचे मेडिकल कॉलेजचे स्वप्न सत्यात उतरले आहे. या निर्णयामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. 30 years wait of people will end, approval of Sindhudurg Medical College
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयासाठी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत मुद्दा मांडला होता. या महाविद्यालयाला परवानगी मिळावी म्हणून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी देखील प्रयत्न केले होते. यावर्षी 100 जागांवर एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश देण्यास मान्यता मिळाल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली.
□ तीस वर्षाची प्रतीक्षा संपली
तीस वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत होता. सप्टेंबरमध्ये एनएमसीकडून देण्यात आलेली मान्यता रद्द करण्यात आल्यानं सिंधुदुर्गवासियांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतीक्षा वाढली होती. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी त्यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती.
सप्टेंबरमध्ये मान्यता मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हावासीयांसाठी ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे जिल्हा वैद्यकीय क्षेत्रात स्वावलंबी बनणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली होती. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला आहे मात्र जे मंत्री, मुख्यमंत्री झाले त्यांनी स्वतःची खासगी मेडिकल कॉलेज काढली”, असा टोला त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला होता.