श्रीपूर : श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि, श्रीपूर यांच्याकडून पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या कोविड लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या २५ हजार सिरीज आरोग्य विभाग पंढरपूर यांना कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते मोफत देण्यात आल्या.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, व व्हा. चेअरमन कैलास खुळे, कारखान्याचे संचालक माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, माजी व्हा. चेअरमन वसंतनाना देशमुख, माजी व्हा. चेअरमन दिलीपराव चव्हाण, दाजी पाटील, ज्ञानदेव ढोबळे, भास्कर कसगावडे, सुदाम मोरे आणी आरोग्य विभागातील डॉक्टर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन आमदार परिचारक म्हणाले, पंढरपूर तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात कोविशिल्ड व कोवॅक्शिन लस उपलब्ध आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असणारी डिस्पोजल सिरींज आरोग्य विभागाकडे शिल्लक नसल्याने लसीकरण करण्यासाठी अडचण येत होती. सदरची अडचण दूर करण्यासाठी आरोग्य विभागास मदत केली आहे. Pandurang factory donated syringes to Pandharpur health department
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आता पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील लसीकरणाला वेग येणार असून लसीकरणापासून वंचित राहणाऱ्या जनतेला लस देता येणार आहे.
कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी म्हणाले, आरोग्य विभागात कोविड लसीकरणाबाबत कारखान्यामार्फत सर्वतोपरी मदत करुन कारखान्याकडे असणाऱ्या सर्व ऊस तोडणी ,वाहतूक मजूर, कामगार यांचे लसीकरण करुन घेतले आहे. त्यामुळे कोविड 19 च्या धोक्यापासून कारखान्याचे मजूर, कामगार यांना होणारा धोका कमी झाला आहे.
आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी पांडुरंग कारखान्याचे आभार मानले. यावेळी कारखान्याचे आरोग्य अधिकारी डाॅ. सुधीर पोफळे, डाॅ. प्रमोद पवार, पंढरपूर आरोग्य अधिकारी डॉ. रेपाळ , डॉ. माळी, दिपक शेंडगे, चौगुले आणि श्रीपूर, महाळुंगचे आरोग्य अधिकारी, डॉ. भारत गायकवाड, संकपाळ एस एस, विद्या वाघमारे, पवार आर एस, कारखाना अधिकारी एम आर कुलकर्णी, आर बी पाटील, रविंद्र काकडे, संतोष कुमटेकर, सोमनाथ भालेकर, तानाजी भोसले, भिमराव बाबर उपस्थित होते.