Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाच लाखांच्या खंडणीसाठी बार्शीत उद्योजकास धमकावले, दोघांवर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पाच लाखांच्या खंडणीसाठी बार्शीत उद्योजकास धमकावले, दोघांवर गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2022/02/14 at 4:06 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

बार्शी : खडी क्रशरच्या विरोधातील तक्रारी मिटविण्यासाठी 5 लाखाची खंडणी मागून 50 हजार रुपये घेतल्याप्रकरणी दोघांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी उद्योजक सुनील राधेशाम भराडीया यांनी फिर्याद दिली आहे.

सुनील भराडीया यांचा मुलगा राघव याचे बार्शी शहरालगत असलेल्या ताडसौंदणे गावाच्या हद्दीत परवानाप्राप्त खडी क्रशर आहे. 15 दिवसांपूर्वी आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी खडी क्रशरचा त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यावर भराडीया यांनी उपाययोजना केल्यानंतर तक्रार मागे घेतली गेली होती.

शुक्रवारी (ता. 11) दुपारी त्यांना बार्शीतून समाधान बोलतो, असे सांगत फोनवर तुझं क्रशर बेकायदेशीर आहे. तुझ्याविरुध्द शेतकर्‍यांनी तहसीलदारकडे तक्रार दिली आहे. माझ्या मागे पत्रकार आहेत. तुझे क्रशर बंद कर, अशी धमकी दिली गेली. त्यावर त्यांनी माझं क्रशर कायदेशीर आहे. माझ्याकडे सर्व परवानग्या आहेत. तुम्ही या तुम्हांला दाखवितो, असे उत्तर दिले. Barshit threatens businessman for Rs 5 lakh ransom, charges filed against both

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

संध्याकाळी पुन्हा त्यांना त्या व्यक्तीचा फोन आला आणि माझं व पत्रकार लोकांचं सगळ्याचं मिटवावं लागेल, तू आज नाही भेटला तर तू उद्याचा दिवस बघत नाही, अशी धमकी दिली गेली. त्यावर त्यांनी खडी क्रशरवर या, समक्ष बोलू असे सांगितले.

खंडणी, धमकीसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

रात्री 10.30 च्या सुमारास ते खडी क्रशरवर आपला मित्र शहाजी वाळके व मुलगा राघव आणि त्याचा मित्र सचिन जाधव यांच्यासमवेत बसलेले असताना दोघेजण आले. त्यापैकी एकाने तुझं खडी क्रशरचं प्रकरण मिटवायचं असेल तर 5 लाख रु. द्यावे लागतील. असं म्हटल्यानंतर त्यांनी माझं क्रशर रितसर आहे, असे सांगितलं. त्यावर त्याने टेबलावरील सामान फेकून दिलं. त्यामुळे त्यांच्यात धक्काबुक्की झाली. त्या व्यक्तीने तू मिटवितो म्हणला होता. पैसे दे अशी खंडणी मागितली.

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=qzRYBUwZ6kg[/embedyt]

त्यावर त्यांनी ड्रावर मधून 50 हजार रुपये काढून त्यास दिले. त्याने दर महिन्याला मला 50 हजार रुपये द्यायचे, असं धमकावले आणि तो निघून गेला. भराडीया यांनी या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. याबाबत पुढील तपास स.पो.नि. शिवाजी जायपत्रे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Barshi #threatens #businessman #5lakh #ransom #charges #filed, #पाचलाख #खंडणी #बार्शी #उद्योजक #धमकावले #दोघांवर #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोणत्याही क्षणी युद्ध, झाली घोषणा ! पेट्रोल होणार 150 रुपये लिटर
Next Article मित्राला सोडवण्यासाठी जाताना स्विफ्टकारचा अपघात, तीन तरूणांचा मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?