Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुण्यात हादरवून टाकणारी घटना; 4 दिवसांच्या बाळाला दरीत फेकलं
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

पुण्यात हादरवून टाकणारी घटना; 4 दिवसांच्या बाळाला दरीत फेकलं

Surajya Digital
Last updated: 2022/02/13 at 2:47 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी 4 दिवसांच्या बाळाला ताम्हिणी घाटातील दरीत फेकून दिले. या बाळाचा शोध  सुरु आहे. मंगल चव्हाण mangal chavan  ही महिला कारने रत्नागिरी जिल्ह्यातील अंबडस या गावाकडे चालली होती. त्यावेळी तिचा पती सचिन चव्हाण व त्याच्या भावांनी ताम्हिणी घाटात In Tamhini Ghat कार थांबवली व मंगलच्या कुशीतील 4 दिवसांच्या बाळाला जबरदस्तीने घेतले. त्यानंतर त्याचा गळा आवळून त्याला दरीत टाकून दिले.

महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं आहे. पुणे – माणगाव रस्त्यावरील ताम्हिणी घाटात हा प्रकार घडला आहे. काल शनिवारी पहाटे, पौड पोलिसांनी बाळाच्या हत्येप्रकरणी रत्नागिरीतील खेडमधून चार जणांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी यासंदर्भात महिती दिली आहे. ‘मुलाच्या आईने शुक्रवारी पोलिसात तक्रार दाखल केली होती. सध्या बाळाचा शोध सुरू आहे.

संबंधित महिला शेळके वस्तीत वास्तव्यास आहेत. रत्नागिरीतील खेड हे तिचं मूळ गाव आहे. या ठिकाणी महिलेचे एका 27 वर्षांच्या व्यक्तीची संबंध होते. घटनेचा माहिती मिळताच आम्ही संबंधित व्यक्तीला त्याच्या भावाला आणि इतर दोघांना अटक केली आहे. पौडमध्ये 30 जानेवारीला महिलेची प्रसूती झाली होती. Shocking incident in Pune; A 4-day-old baby was thrown into a ravine

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

यावेळी महिलेचे संबंध असणारा पुरुष आणि त्याचे मित्र प्रसूतीसाठी आले होते. शनिवार, 5 फेब्रुवारीच्या पहाटे हे चारजण महिलेसोबत खेडला जाण्यासाठी निघाले. यावेळी ते ताम्हिणीतील पुलावर थांबले आणि महिलेच्या हातातून बाळाला घेऊन गेले. तासाभराने ते परतले आणि गाडीत बसून निघून गेले. अखेर महिला खेडहून परतली. यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला, असं पोलिसांनी सांगितलं.

□ कशामुळे घडली ही निर्दयी घटना

मूळची आंबेत, ता.म्हसळा, जि. रायगडमधील रहिवासी असलेली मंगल पवार ही मजूर महिला घोटवडे, ता.मुळशी परिसरात राहत होती. तिच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते व त्यापासून तिला एक 11 वर्षाची मुलगी होती. महिलेचे नात्यातील सचिन गंगाराम चव्हाण (मूळ रा.आंबादास, ता.खेड, जि.रत्नागिरी) याच्या सोबत सूत जुळल्याने त्याच्यासोबत ती शेळकेवाडी-गोडांबेवाडी परिसरात तिच्या मुलीसह राहत होती. सचिनपासून आलेल्या संबंधातून 30 जानेवारी रोजी महिलेने बाळाला जन्म दिला.

सचिनचे भाऊ संजय गंगाराम चव्हाण, नितीन गंगाराम चव्हाण, अजय गंगाराम चव्हाण ( तिघेही रा. आंबादास, ता.खेड, जि.रत्नागिरी) हे सचिनला पीडित महिलेसोबत राहू नकोस म्हणून सांगून घेऊन जात असत. मुलाला जन्म दिल्यानंतर ते आणखी खवळले. त्यातूनच ही निर्दयी घटना घडली.

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #Shocking #incident #Pune #oldbaby #thrown #ravine, #पुणे #हादरवून #घटना #4दिवसांच्या #बाळ #दरीत #फेकलं
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मित्राला सोडवण्यासाठी जाताना स्विफ्टकारचा अपघात, तीन तरूणांचा मृत्यू
Next Article सोलापुरातील जोडभावी पेठची राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच पोलीस ठाण्यात निवड

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?