मुंबई : राज्यात शिवजयंती तारखेनुसार आणि तिथीनुसार साजरी करण्याबद्दल वेगवेगळी मत आहेत. आता त्यावरून शिवसेना आमदार संजय शिरसाठ आणि विधान परिषद सदस्य आंबादास दानवे यांनी शिवजयंती फक्त १९ फेब्रुवारीलाच साजरी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. एकदाच शिवजयंती साजरी केल्यास मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजरी होईल. त्यामुळे पक्ष आणि संघटनेमध्ये शिवजयंती साजरी करण्यावरून संभ्रम होणार नाही, असंही मत व्यक्त केलं.
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून १९ फेब्रुवारीला तारखेनुसार आणि दुसऱ्यांदा तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. दोन वेळा शिवजयंती साजरी करण्याबद्दल अनेक पक्ष आणि संघटनांची वेगवेगळी मतं आहेत. शिवसेना आतापर्यंत तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावर ठाम होती. मात्र आता औरंगाबादचे शिवसेना आमदार संजय शिरसाठ आणि विधान परिषद सदस्य आंबादास दानवे यांनी शिवजयंती फक्त १९ फेब्रुवारीलाच साजरी व्हावी अशी मागणी केली आहे.
शिवजयंती साजरी करताना प्रत्येक पक्ष संघटनांमध्ये संभ्रम असतो. एकदाच जयंती साजरी केल्यास जल्लोष मोठा करता येईल. छावासह अनेक संघटनांनी याबद्दल मागणी केली होती. तसंच जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात शिवजयंती एकदाच शिवजयंती व्हावी ही आमची मागणी आहे असं आमदार संजय शिरसाट आणि दानवे यांनी सांगितलं. Celebrate Shiva Jayanti on 19th February only; 500 people allowed for Shivjanmotsava
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ शिवजन्मोत्सव सोहळ्याकरिता ५०० जणांना परवानगी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत २०० जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता ५०० जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.
तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.
यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योत दौडीत २०० जणांना सहभागी होता येईल. तसेच शिवजन्मोत्सव सोहळ्यात ५०० जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.