सोलापूर – इंगळगीचे सरपंच लक्ष्मी वळसंगे यांच्यावर दाखल झालेला ठराव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रद्द केला आहे. त्यामुळे वळसंगे यांचे सरपंचपद कायम राहिल्याने माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या गटाचे कमळ पुन्हा एकदा फुलले आहे.
इंगळगी ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मी वळसंगे यांची निवड होऊन सात महिन्याच्या आतच काही सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. तहसीलदार अमोल कुंभार यांनी तो मंजूर केला होता. मात्र तहसीलदार कुंभार यांच्याकडून 5 मार्च 2020 चे शासन निर्णय आणि नवीन ग्रामपंचायत कायद्यातील सुधारणेचा कोणताच विचार झालेला नव्हता.
त्यामुळे वळसंगे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तहसीलदार यांच्या निर्णयाविरोधात अपील केली होती. No-confidence motion against Ingalgi Sarpanch finally canceled; Collector’s decision
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यावर सहा ते सात वेळा सर्व सदस्यांची व संबंधित व्यक्तींची सुनावणी घेऊन आणि अभ्यास करून जिल्हाधिकारी शंभरकर यांनी वळसंगे यांचे अपील मंजूर करून त्यांचे सरपंचपद कायम ठेवत असल्याचा निकाल दिला आहे.
ग्रामपंचायत कायद्यातील नवीन सुधारणानुसार सदस्यांनी विश्वासाचा प्रस्ताव व ठराव चुकीच्या पद्धतीने केल्याचा निकाल जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जाहीर केला आहे. तहसीलदार कुंभार यांनीही चुकीच्या पद्धतीने तो ठराव मंजूर केला होता, असेही आदेशात म्हटले आहे. नवीन कायद्यानुसार अविश्वासाचा ठराव करताना सभेच्यावेळी नऊ पैकी सात सदस्य लागतात.
प्रस्ताव दाखल करताना सहा सदस्य हवे असतात. त्याचबरोबर सरपंच निवड होऊन दोन वर्षांपर्यंत अविश्वास ठराव दाखल करता येत नाही, असे शासन निर्णय आहे. त्या सर्व निर्णयाचा विचार करून जिल्हाधिकारी शंभरकर यांनी वळसंगे यांच्या बाजूने निकाल दिला आहे.