सोलापूर : मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात आज मंगळवारी सकाळी (ता. १५) भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले असून पाचजण जखमी, यातील तीन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यात ट्रक आणि टेम्पोच्या मध्ये सापडून कारचा चुराडा झाला. यात कारमधील चौघांचा मृत्यू झाला. सर्व मृतदेह खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले आहेत. गौरव खरात (३६), सौरभ तुळसे (३२), सिद्धार्थ राजगुरू (३१ ), मयुर दयानंद कदम (वय ३० सर्व रा. सोलापूर) वेगाने मदतकार्य करून अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सह्याने रस्त्यावरुन बाजूला केली. सध्या या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे. Terrible accident on Mumbai-Pune highway; Congress leader Gaurav Kharat and four others killed in Solapur
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=3eG6O6YrOIo[/embedyt]
अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झालाय. एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली. यात ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने कारचा चुराडा झाला. या भीषण अपघातामध्ये दोन मोठ्या वाहनांच्यादरम्यान चिरडल्या गेलेल्या कारमधील चौघेही जागीच ठार झालेत.
ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने पाच वाहनांचा अपघात घडला. पाच वाहनांचा अपघातात कंटेनरने पुढे जाणा-या स्वीफ्ट कारला धडक दिली. स्वीफ्ट कार तिच्या पुढे जणाऱ्या आयशर टेम्पोला मागून धडकली. टेम्पोने तिच्या पुढील वेन्यू कारला जोरदार धडक दिली. या अपघातात स्वीफ्टमधील चारही प्रवासी जागीच ठार झाले तर टेम्पोने धडक दिलेल्या कारमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले. टेम्पोची धडक बसलेल्या वेन्यू कारने पुढे जाणा-या कंटेनरला जोरदार धडक दिली. मात्र हा कंटेनर पुढे निघून गेला.
□ भीषण अपघात; काँग्रेस नेत्यासह 4 जणांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबई-पुणे एक्सप्रेसवर खोपोली हद्दीत आज पहाटे सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात सोलापूरमधील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव खरात यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला. मृत झालेले तिघे सोलापूरचे आहेत. तसेच या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. ते जालना जिल्ह्यातील आहेत. गौरव खरात यांच्या अपघाती मृत्यूमुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.