Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्रात भाजपाचे सरकार बनविण्याची तयारी : चार राज्यात भाजपाला विजयाची खात्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

महाराष्ट्रात भाजपाचे सरकार बनविण्याची तयारी : चार राज्यात भाजपाला विजयाची खात्री

Surajya Digital
Last updated: 2022/02/15 at 1:11 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

□ महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल – रामदास आठवले

□ वाईन विक्रीला आरपीआयचा विरोध

पंढरपूर : महाविकास आघाडी सरकार सर्व स्तरावर निष्क्रिय ठरले आहे. केंद्र सरकारकडून आलेला निधी व योजना राबविण्याची मानसिकता नसल्याने जनतेमधून आक्रोश व्यक्त होताना दिसत आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले तर भाजपाची सत्ता स्थापन करण्याची तयारी असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

पंढरपूर येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले आले होते. शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राजाभाऊ सरवदे, सुनिल सर्वगोड, संतोष पवार, सोमनाथ भोसले, चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले की, आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला राज्य सरकारकडून जास्ती जास्त निधी देण्यात यावा. निधी कमी देण्यात येत असल्याने लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. BJP ready to form government in Maharashtra: BJP sure of victory in four states

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

केंद्र सराकारकडून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृती वेळेत दिली जाते. परंतु राज्याकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृती वेळेत न दिल्याने विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे. महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. याच खड्ड्यात महाविकास आघाडी सरकारला घालण्याचे काम जनतेला करायचे आहे, असे आवाहन आठवले यांनी केले.

□ बाळासाहेबांच्या विचारांच्याविरोधात आघाडी

राज्य सरकारच्या कारभारावर आठवले यांनी जोरदार टीका केली. राज्य सरकार योग्य काम करीत नाही यामुळे रस्त्यावर सर्वत्र खड्डे असून असे सरकार खड्ड्यात घालावे लागेल अशी टीका केली. केंद्राकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती दिली जाते परंतु राज्य सरकार ती विद्यार्थ्यांना लवकर देत नाही. अण्णाभाऊ साठे महामंडळ तसेच महात्मा फुले महामंडळांना राज्य सरकार निधी देत नसल्याने मागासवर्गीय समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप केला. खरे तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे भीमशक्ती व शिवशक्ती एकत्र यावी असे स्वप्न होते. मात्र या शिवसेनेने स्व. बाळासाहेब यांच्या विचारांच्याविरोधात आघाडी करून राष्ट्रवादी पक्षाला बळ दिले असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली..

 

□ वाईन विक्रीला आरपीआयचा विरोध

राज्य सरकारकडून किराणामाल दुकानान वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राची संस्कृती बदनाम करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. किराणा, मॉलमध्ये वाईन विक्रीला रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाचा विरोध असल्याचेही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #BJP #ready #government #Maharashtra #victory #four #states, #महाराष्ट्र #भाजप #सरकार #बनविण्याची #तयारी #चार #राज्य #विजय #खात्री
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात; काँग्रेस नेते गौरव खरातसह सोलापूरचे चारजण ठार
Next Article फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा, राऊत यांचा आरोप; भाजपचे लोक ईडीचे वसुली एजंट

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?