□ शासनाच्या मनोधैर्य योजनेतून एक लाख रुपये भरपाई देण्याचेही आदेश
सोलापूर – एका मतिमंद तरुणीवर बलात्कार करून तिला ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून नरेश जनार्धन कोंडा (वय २१ रा. सोलापूर) याला १२ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा विशेष न्यायाधीश यु.एल. जोशी यांनी दिली. तसेच पीडितेस शासनाच्या मनोधैर्य योजनेतुन १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश निकालातून दिला आहे.
आरोपी नरेश कोंडा हा शहरातील सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास आहे. त्याच्या घराजवळ मतिमंद तरुणी देखील राहण्यास होती. २० जानेवारी २०२१ रोजी पीडित तरुणी ही घराजवळील सार्वजनिक शौचालयास गेली होती. त्यावेळी आरोपी नरेश कोंडा याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला होता. तसेच झाल्या घटनेची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती.
यासंदर्भात पिडीतेच्या आईने सदर बझार पोलिसात फिर्याद दाखल केली. या घटनेच्या तपास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे आणि फौजदार एन.एस. गंपले यांनी करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. मानसोपचार तज्ञ यांनी पीडित तरुणी ही मतिमंद असल्याची साक्ष न्यायालयात दिली होती. पिडीत तरुणी, मुळ फिर्यादीची साक्ष आणि सरकार पक्षाने मांडलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला १२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. Rape of a mentally retarded young woman; Accused sentenced to 12 years hard labor
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या खटल्यात सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील अँड. प्रदीपसिंग राजपूत तर आरोपीतर्फे अँड. दीपक सुरवसे आणि अँड. दिलीप जगताप यांनी काम. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस शिपाई मल्लिकार्जुन कोटाणे यांनी काम पाहिले.
□ मुलाच्या सासऱ्याने केली काठीने मारहाण महिला जखमी
सोलापूर – सून आणि मुलाचे घरगुती भांडणाची तक्रार सांगण्यात गेले असता मुलाच्या सासर्याने काठीने मारहाण केली. त्यात गंगाबाई मालप्पा पुजारी (वय ५० रा. चिंचपूर ता.दक्षिण सोलापूर) ही महिला जखमी झाली.
ही घटना मंगळवारी (ता. १५) सकाळच्या सुमारास शेतात घडली. गंगाबाई पुजारी यांचा मुलगा आणि सुनेचे घरगुती भांडण झाले होते. ते सांगण्यासाठी गंगाबाई या मुलाच्या सासरी शेतात गेल्या होत्या. त्यावेळी दयानंद श्रीमंत चोरमुले (मुलाचे सासरे) यांनी त्यांना काठीने बेदम मारहाण केली. तोंडास आणि हातास मार लागून त्या जखमी झाल्या. त्यांना मंद्रूप येथे प्राथमिक उपचार करून त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे.