मुंबई : गायिका वैशाली माडेने फेसबुक अकाऊंटवर खळबळजनक पोस्ट केली आहे. काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन मी याचा गौप्यस्फोट करणार आहे. असे वैशालीने पोस्टमध्ये लिहिले आहे. वैशालीने काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिच्याकडे विदर्भाचं विभागीय अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे पक्षात स्वागत केले. राष्ट्रवादीच्या मुंबईतील मुख्यालयात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आता वैशालीने फेसबुकवर पोस्ट टाकली आहे.
गायिका वैशाली माडे-भैसने (Vaishali Made-Bhaisane) हिने नुकतीच सोशल मीडियावर एक धक्कादायक पोस्ट लिहिली आहे. वैशाली माडेच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चाहते आणि प्रेक्षक तिला काळजी घेण्याचा आणि सांभाळून राहण्याचा सल्ला देत आहेत.
एका सर्वसामान्य घरातील मुलगी ते चित्रपट सृष्टीतील नामवंत गायिका हा वैशाली यांचा प्रवास अतिशय संघर्षाचा आहे. ‘My assassination plot is being hatched’, post by singer Vaishali Made
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
‘झी’ वरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावल्यानं वैशाली यांचे महाराष्ट्रासह देशभरात चाहते आहेत. वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी देखील आहेत.
वैशाली माडे यांचा एका सुप्रसिद्ध गायिकेपर्यंतचा प्रवास मोठ्या संघर्षासह अनेक चढ-उतारांचा राहिला आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खार तळेगाव येथे झाला आहे. त्यांचं माहेरचं नाव वैशाली भैसने. बालपणी गरिबीमुळे त्यांना अनेक हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्यात. मात्र, याही परिस्थितीत त्यांनी त्यांच्यातील गायिका जिवंत ठेवली. पुढे त्यांचं लग्न वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे अनंत माडे यांच्याशी झालं. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पतीचाही मोठा वाटा आहे.
आज मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, अशी पोस्ट तिने केली आहे. यामुळे राजकीय आणि कला क्षेत्रात खळबळ माजली आहे. वैशाली सामान्य शेतकरी कुटुंबातून आली आहे. तिने हिंदी आणि मराठी भाषांमधील सिनेमांमध्ये पार्श्वगायन केले आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी सिनेमातील ‘पिंगा’ हे तिचे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. असे असताना वैशालीने अचानक केलेल्या या फेसबुक पोस्टमुळे खळबळ माजली आहे.