यवतमाळ : यवतमाळमधील एका तरुणाने आपल्या घरावर 5 फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. तसेच नित्यनियमाने न चुकता तो महाराजांची पूजादेखील करतो. याबाबत सचिन भोयर यांनी तरुण वर्गाला आवाहन केले आहे. ते म्हणाले, पुतळ्यावरून राज्यात राजकारण होताना दिसते. त्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या घरीच छत्रपती आणि राष्ट्रमाता जिजाऊंचा पुतळा उभारावा. तरुणाईने छत्रपतींचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारावा.
यंदा कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केलीय जातीय. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध शहरातील ढोल पथकांकडून वादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येत आहे. सध्या राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरून राज्यभरात राजकारण तापवण्याचा प्रयत्न सुरू आहेय.
सचिन भोयर यांचे हे आर्णी येथील रहिवासी असून, लहान पणापासून शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी अंगिकारले आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्याशिवाय ते घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे स्वत:चे घर बांधते वेळी त्यांनी पाच फुट उंचीचा शिवरायांचा पुतळाही आपल्या घरावर बसवला आहे. त्यांच्या संकल्पनेचे आणि कृतीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
सचिन भोयर या शिवप्रेमी तरूणानं एक वेगळाच आदर्श घालून दिलाय. त्यानं चक्क आपल्या घरावरच शिवरायांचा पाच फुटांचा पुतळा स्वत:च्या खर्चातून उभारलाय. शिवाय तो दररोज नित्यनेमानं शिवपूजन करीत शिवजयंती साजरी करीत असतोय. The youth erected a 5 feet high statue of Chhatrapati Shivaji Maharaj on the house itself
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सचिनचं आर्णीतलं घर लोकांसाठी कुतूहल आणि अभिमानाचा विषय बनलंय. त्याच्या घरासमोरून जाणारा प्रत्येकजण अदबीनं झुकतो अन नमस्कारही करतोय. हा नमस्कार असतोय छत्रपती शिवाजी महाराजांना… सचिननं आपल्या घरावरच छत्रपतींचा पाच फुटांचा सुंदर पुतळा बसविला आहे. सचिनच्या दररोजच्या दिवसाची सुरूवातही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून होतेय.
सचिनला लहानपणापासूनच छत्रपती शिवरायांचा इतिहास, व्यक्तीमत्व आणि विचारांविषयी प्रचंड आकर्षण आणि अभिमान. यातूनच तो वर्षभर शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती करून देणारे विविध उपक्रम राबवित असतोय. यातूनच घर बांधतांनाच शिवरायांचा पुतळा उभारण्याचा विचार त्याच्या मनात आलाय. सार्वजनिक ठिकाणच्या पुतळ्यांची होणारी आबाळही त्यानं सातत्यानं पाहिलीय. त्याच्या या कृतीशील विचारांचा त्याचे शेजारी आणि मित्रांनाही अभिमान आहे.
अलिकडच्या काळात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांवरून राज्यभरात होत असलेलं राजकारण आणि चिखलफेक अस्वस्थ करणारी असल्याचं सचिनला वाटतंय. महाराजांना कृतीतून अंगीकारण्याचं आवाहन तो करतोय. ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी’, असं म्हटलं जातंय. शिवजयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज विचार आणि कृतीनं आपल्यात झिरपले तरच ती त्यांना खरी आदरांजली ठरेल, हेही तेव्हढंच खरं आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज अठरापगड जातीचे होते. त्यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा असाच आहे. घरी बसविलेल्या पुतळ्याचे मी रोज पुजन करतो. त्यानंतरच आपल्या कामासाठी बाहेर पडतो. पुतळ्यासाठी वादविवाद न करता प्रत्येकाने आपल्या राजाचा पुतळा घरीच बसवावा.”
– सचिन भोयर